फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पृथ्वी चौकात आज सकाळी 9: 20 च्या सुमारास भरगाव ट्रकने धडक दिल्याने त्या ट्रकखाली सापडून दुचाकीस्वार एका वृद्धाचा अपघातात दुर्दैवी जागीच मृत्यू झाला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ट्रक नं. mh - 45 - 0078 हा पृथ्वी चौकातून नाना पाटील चौकाकडे जात असताना भरघावाने येत पुढे आपल्या कापड दुकानात बजाज m 80 नं. mh 11- c - 8853 या मोटारसायकलवरून जात असलेले साहेबराव अण्णा राऊत राहणार लक्ष्मीनगर फलटण (वय 60) हे जागेवरच ठार झाले असून पोलीस व अंबुलन्स घटनास्थळी पोहोचले परंतु अपघातात जागेवरच राऊत यांचा मृत्यू झाला होता. हा अपघात एवढा भयानक होता की त्यांच्या शरीरातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला यामुळे ते जागेवरच कोसळल्या क्षणी त्या ठिकाणच्या लोकांनी खूप त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांचा त्या अपघातात दुर्दयवी मृत्यू झाला अपघाताच्या ठिकाणी पोलीस व अंबुलन्स लगेच आली परंतु त्यांना डोक्याला,व पोटाला जबर मार लागला होता या अपघाताची नोंद शहर पोलीस ठाण्यात झाली असून ट्रक चालक तात्या उत्तम माने,रा.सापटने (टेंभुर्णी जवळ) ता.माढा जि. सोलापूर या चालकावर गुन्हा दाखल झाला असून सदर चालकास अटक करण्यात आली आहे. या अपघाताची फिर्याद स्वप्नील विष्णू गायकवाड यांनी दिली असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मुंढे करीत आहेत.
सायंकाळी 4.30 वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात धुळदेव ता.फलटण येथे राऊत यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
गेल्या दोन वर्षात रिंगरोड परिसरात अपघातांची मालिका सुरू असून या मध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे या मुळे या रिंगरोड वरून जाणाऱ्या वाहनांची पर्यायी मार्गाने वाहतूक होण्यासाठी शहराबाहेर होणाऱ्या प्रस्तावित मोठ्या रिंगरोडला कधी मुहूर्त लागणार आहे असा सवाल फलटणकर करीत असून रिंगरोड वरील अनेक भागात वाहने रस्त्याच्या कडेला उभी असतात. अनेक दुकानदार यांनी रस्त्यावर अतिक्रमण केले आहे तर रस्त्यालगत अनेक दुकानदारांनी सामान ठेवले आहेत. तसेच या ठिकाणी रस्ता फारच खराब झाला आहे. सदर रस्ता दुरुस्त करण्यात यावा या मार्गाने सध्या ऊस वाहतूक व मोठे ट्रक व इतर वाहने जा ये करीत असतात परंतु या वाहनांच्या वेग मर्यादेकडे कोण लक्ष देत नसल्याने आज पर्यंत अनेक लोकांना जीव गमवावा लागला आहे.या मुळे वेग मर्यादेचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
No comments:
Post a Comment