सातारा जिल्ह्यातील आमच्या तमाम वाचकांचे मनःपूर्वक आभार
दि १० सप्टेंबर पासून सुरु केलेल्या दैनिक सत्य सह्याद्री च्या ऑनलाईन साईट वरील वाचकांची संख्या आज १० लाख झाली. वाचकांनी भरभरून केलेल्या या प्रेमामुळे आम्ही भारावून गेलो असून. यापुढील काळातही वाचकांशी असलेली आमची बांधिलकी कायम राहील.
आज दररोज किमान १५ हजार लोक सत्य सह्याद्री वेब साईट पाहतात त्यावरील बातम्या वाचतात आम्हाला प्रतिक्रियाही देतात. (आणि हो ही आकडेवारी अधिकृत आहे. गुगल ने दिलेली)
आमची सेवा तुम्हाला कशी वाटली आम्हाला जरूर कळवा आमचा मेल आयडी आहे satyasahyadry@gmail.com
नेटवर्क निर्माण करणे सोपे नाही. काही ठिकाणचे वाचकच आमचे नेटवर्क आहे. येथून पुढच्या काळात हे वाचकरूपी नेटवर्क आणखी समृद्ध, वाचकप्रिय करू. काही चुकीचे असेल तरी आम्हाला सडेतोडपणे कळवा त्यानुसार आम्ही बदलही करू.
महत्वाचे म्हणजे हे यश मिळण्यासाठी आमच्या सर्व टीम चे हि मोलाचे योगदान आहे. पुन्हा एकदा सत्य सह्याद्री वर विश्वास दाखवणारे वाचक, हितचिंतक, जाहिरातदार, ज्ञात अज्ञातांचे मनपूर्वक आभार
मुळात आमची कुणाशीही स्पर्धा नाही आणि बरोबरीही नाही.
धन्यवाद
संपादक
दैनिक सत्य सह्याद्री सातारा
No comments:
Post a Comment