फलटण@ सत्य सह्याद्री वृतसेवा
धुळदेव ता.फलटण येथील धुळदेव विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीच्या संचालक यांनी कर्ज काढली आणि ती वेळेत भरली नाहीत म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी शेतकरी यांनाच या मुळे पिक कर्ज मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की निम्याहून अधिक सोसायटीच्या संचालकांनी हजारो रुपयांची कर्जे काढली आणि ती वेळेत भरली नाहीत या मुळे या धुळदेव सोसायटीच्या शेतकऱ्यांना नवीन कर्ज मिळण्यास अडथळा येत आहे. सर्वसामान्य शेतकरी यांनी नवीन कर्ज मिळण्यासाठी आपले अर्ज सेक्रेटरी यांच्याकडे दिले, सोबत सातबारे जोडले, क.म. मिळवून शेतीसाठी खर्च करावा लागणार असल्याने सात बाऱ्या वर कर्ज घेतल्याच्या नोंदी सुद्धा करून घेतल्या अशी संपूर्ण प्रकरणे आल्यावर चक्क त्यांना सांगण्यात आले की तुमचे संचालकांनी कर्ज भरली नसल्याने तुम्हाला नवीन कर्ज देता येत नाहीत या मुळे अनेक शेतकऱ्यांनी या बाबत नाराजी व्यक्त केली असून ज्या संचालकांनी कर्ज भरली नाहीत त्यांच्यावर कारवाई कोणच करताना दिसत नाही मात्र वेळेवर कर्ज भरून तीळ तीळ मरताना शेतकरी मात्र दिसत आहे.
यामुळे आपल्या पदाचा दुरुपयोग करून या संचालकांनी हजारो रुपयांची कर्जे भरलीच नाहीत या मुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली असून या बाबत लवकरात लवकर तोडगा काढून या संचालक मंडळाच्या वर कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली असून असे संचालक कर्ज काढण्यासाठी संबंधित सेक्रेटरी व बँकेच्या विकास अधिकारी यांची सहकारी कायदा कलम 73 कअ(1)(अ)(ब) नुसार कर्जाची वसुली करण्यासाठी का ठोस कारवाई करीत नाहीत असा सवाल शेतकऱ्यांनी केला असून ही लाखो रुपयांची कर्जे काढते वेळी हेच सेक्रेटरी व विकास अधिकारी कोणाला पाठीशी तर घालून बँकेसह गावाच्या भल्यासाठी स्थापन केलेल्या सोसायटीचा दुरुपयोग करतायत का असा सवाल शेतकरी करीत आहेत.
दुसरीकडे सोसायट्यांना वित्त पुरवठा करणारी सातारा जिल्हा मध्यवर्तीय बँकेने या सोसायटीच्या क.म मंजूर करतेवेळी थकीत संचालकांच्या कर्ज वसुली नंतरच सभासदांना मंजूर झालेले कर्ज वाटप करण्याचा लेखी आदेश दिला आहे. मुळात क.म दाखल करतेवेळी सोसायटी सचिव यांनी संचालक याची थकीत कर्ज रकमेची वसुली करूनच क.म मंजुरीसाठी पाठवायला हवे होते परंतु तसे न करता क.म मंजुरीसाठी पाठविले व सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेने क.म जमा करते वेळी थकीत संचालक नाहीत ना याची खात्री करायला हवी होती व नंतरच क.म मंजुरीसाठी घ्यायला हवे होते. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आदेशामुळे शेतकरी यांना नवीन पिक कर्ज वाटप थांबले आहे. एकीकडे कर्जमाफीच्या कचाट्यातून शेतकरी सुटतोय तोच त्याला सातारा जिल्हा मध्यवर्तीय बँकेच्या अशा जाचक अटीमुळे पिक कर्जास व पिकास मुकावे लागत आहे.
No comments:
Post a Comment