दहिवडी@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने माण तहसिल कार्यालयाने शुक्रवारी आगळावेगळा उपक्रम साजरा केला दरवर्षी नेहमी स्वतंञ्य सैनिक वीरपत्नी यांचा सत्कार केला जातो. तो आजही करण्यात आला.सांस्कृतिक कार्यक्रम ही नेहमी प्रमाणे साजरा करण्यात आला परंतू तहसीलदार सौ.सुरेखा माने यांच्या कल्पनेतून व प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाने माण तालुक्याची माण उंचवणार्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला.
विविध खेळातून प्राविण्य मिळवलेले खेळाडू आय पी एस आधिकारी झाल्याबद्दल बिदालचे प्रविण इंगवले, वाटर कप स्पर्धेत उत्तुंग कामगीरी केलेल्या बिदाल, किरकसाल, परकंदी, अनभुलेवाडी या गावांचा सत्कार सरपंच यांनी स्विकारला तर या चार गावातील प्रशासकीय जबाबदारी संभाळणारे ग्रामसेवक तलाठी मंडलधिकारी यांचा ही सत्कार करण्यात आला. पोलीस ठाण्यातील उल्लेखनीय काम केलेल्या परकंदीचे अत्याचार प्रकरण, वावरहिरे घाटातील चोरी व स्वतःच्या मुलाची विष पाजून हत्या करणार्याला पकडून विशेष कामगिरी केल्याबद्दल तिनीही पोलीस पथकाचा सन्मान व शासनाचा जलयुक्त पुरस्कार मिळवणारे पत्रकार रुपेश कदम आणि अनुलोमचा उत्कृष्ठ तहसिलदार म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल सौ.सुरेखा माने यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
सांस्कृतिक कार्यक्रमात देशभक्तीपर गीताने सुरुवात झाली जिल्हा परीषद शाळा गौसावी वस्ती यांनी शेतकर्यांच्या जीवनावरील जीवंत देखावा सादर केला तर तुफान आलं या या पाणी फौंडेशनचे गीत प्रथमच साजरा करण्यात आले .प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून प्रथमच आसा भरगच्च आणी आगळा वेगळा कार्यक्रम घेण्यात आला. विशेष म्हणजे माणच्या तहसीलदार सुरेखा माने यांनी सन्माननीय व्यक्तीशी गेली दोन दिवस संपर्क साधून कार्यक्रमाचे नियोजन केले. सत्कार मुर्तीना प्रशस्तीपञ गुलाब पुष्प श्रीफळ व एक झाड देण्यात आले.
यावेळी माने गटविकास आधिकारी शेलार, आमदार जयकुमार गोरे सभापती रमेश पाटोळे उपसभापती नितीन राजगे नगराध्यक्षा सौ.साधना गुंडगे उपनगराध्यक्ष दिलीपभाऊ जगदाळे जि.प सदस्य अरुण गोरे यांसह सर्वच क्षेञातील मान्यवर उपस्थित होते.

0 Comments