Ticker

6/recent/ticker-posts

"मायणी मधे राजमाता अहिल्यादेवी प्रतिष्ठान तर्फे अन्नदान "


मायणी @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क  
प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून मायणी मधील राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठाणच्या कार्यकर्त्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासताना अन्नदान सारखे पवित्र काम केले आहे यामुळे गावात सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे

आज देशात प्रजासत्ताक दिन जल्लोषात साजरा होतोय पण समाजातील काही लोक अजून या मध्ये गरीब परिस्थिती मुळे यात सामील होऊ शकत नाहीत तरी मायणीतिल काही तरुण युवक वडूज रोड शेजारील झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब लोकांना स्व खर्चातून वर्गणी काढून अन्नदान करून एक चांगला उपक्रम व सामाजिक काम केले , याप्रसंगी  प्रतिष्ठान चे अध्यक्ष नितीन पडळकर, उपाध्यक्ष भाग्यवंत शिंगटे, अक्षय कचरे, सुरज खांडेकर, संतोष ढवळे, सचिन कचरे, रवी खांडेकर व इतर सदस्य उपस्थित होते

Post a Comment

0 Comments