तडवळे@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
तडवळे ता.खटाव येथे ग्रा.पं.च्या वतीने प्रजासत्ताकदिनी ग्रामसभेमध्ये दारूबंदी करण्याचा ऐतीहासिक निर्णय ग्रामपंचायत व ग्रामस्थांचे वतीने एकमुखी घेण्यात आला.यावेळी या विषयाचा ठराव उपसरपंच श्री पी.डी.पाटोळे यांनी मांडला त्यास संपूर्ण गावाने हात उंच करून हा ठराव सहमंत केला.
तडवळेमध्ये जि.प.शाळेमध्ये श्री बाळासो पवार (अध्यक्ष ,शालेय शिक्षण समिती) यांचेहस्ते ध्वजारोहन करण्यात आला. तर ग्रामपंचायतीचा ध्वजारोहन श्री. पी.डी.पाटोळे (उपसरपंच) यांचेहस्ते तर भैरवनाथ विदया मंदिराध्ये सौ.छाया पाटील (सरपंच ग्रा.पं.) तसेच सोसायटीचा दामू साबळे (चेअरमन) , तर बँकेमध्ये आनंदराव पवार यांनी ध्वजारोहन केले.
ग्रामस्थांनी ग्रामसभा क्रांतिकारी केली .यावेळी गावचा विकास लक्ष मानून सरपंच सौ छाया पाटील यांनी अनेक धाडसी निर्णय घेतले. गाव पाणीदार करण्यासाठी गावात वाँटरकप स्पर्धेत सहभाग घेण्यात आला.
यावेळी मुलांनी नेत्रदिपक कवायती करून ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले तर उपस्थित सर्वांना ग्रामपंचायतीच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी ग्रा.पं.चे सचिव सचिन सस्ते यांनी प्रस्ताविक केले तर आभार ग्रा.पं.चे लिपिक जे.के.काळे यांनी केले.

0 Comments