पाटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कोयना धरण सुरक्षेच्या कारणावरून लादण्यात आलेल्या निब॔ंधामुळे नेहमीच चचेॅत असते, आता या धरणातील पाण्यावर निम॔ण होणा-या विजनिमिॅती प्रकल्पावरही सुरक्षेची कुराड कोसळली आहे, यापुढे कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या चारही टप्प्यांकडे जाण्यास पय॔टकांना बंदी घालण्यात आली आहे,
केंद्रीय गुप्तचर विभागाच्या माहीतीनंतर ही बंदी घालण्यात आली असुन सबंधित विभागांना नुकतेच या बाबतचे परिपत्रक पाठविण्यात आले आहे.
या मुळे आता पय॔टकांना पोफळी, कोयना धरण, चौथा टप्पा,अलोरे, पायथा विजगृह हे प्रकल्प पाहता येणार नाहीत, असे परिपत्रकच मुख्य अभियंता महानिमिॅती पोफळी यांनी काढले आहे,
वास्ताविक पाहता भारतीय अभियंत्यांचा बुद्धिमतेचा अविष्कार या प्रकल्पाच्या रूपाने पहायला मिळतो. नव्या पिढीला व तांत्रिक, औद्योगिक क्षेत्रातील मंडळींसाठी अभ्यास दिशा व दुरदृष्ठीसाठी असे प्रकल्प माग॔दश॔क ठरत असल्याने असे प्रकल्प सवांसाठी खुले असणे आवश्यक आहे,मात्र सुरक्षेचा बागुलबूवा करून असे प्रकल्प जनतेपासून दूर ठेवले जात आहेत.
No comments:
Post a Comment