फलटण तालुक्यात अवैध वाळू उपसा जोमात महसूल विभाग कोमात (व्हिडिओ पहा) - सत्य सह्याद्री

ठळक

Friday, January 12, 2018

फलटण तालुक्यात अवैध वाळू उपसा जोमात महसूल विभाग कोमात (व्हिडिओ पहा)



फलटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
दालवडी (ता. फलटण) येथील गायकवाड वस्तीलगत असणाऱ्या बाणगंगा नदीच्या लगतच्या शेतातून बेसूमार वाळू उपसा जोमाने सुरू आहे. तर या अवैध वाळू उपशाला रोखण्याला फलटण तालुका तहसील कचेरी कमी पडत असून याला मंडलाधिकारी व तलाठी तसेच महसूल विभाग जबाबदार आहे. तसेच काही मंडळींकडून मिळणाऱ्या मलीदा प्रवृत्तीमुळेच कारवाई होत नसल्याची या भागात चर्चा आहे.
फलटण तालुक्‍यातील पश्‍चिम भागातील बाणगंगा नदीला व लगतच्या शेताला वाळू माफियांनी घेरले आहे. बाणगंगा येथील नदीलगत गेली अनेक दिवस बेकायदेशीरपणे वाळूचा उपसा सुरू आहे. यामुळे नदी पात्राशेजारी वाळुचा अवैधरीत्या उपसा करुन उपसा केलेल्या वाळूचे उंचच्या उंच ढिगारे  पहायला मिळत आहे.

या नदीच्या पात्रातून तसेच लगतच्या शेतातून जबरदस्ती लाखो रुपयांची वाळूचा उपसा होत असून आताही तो जोमाने सुरू आहे. दालवडी या गावापासून गायकवाड वस्तीच्या काही अंतरावर वाळू माफिया वाळू उपसा करू लागले आहेत यावर तलाठी यांच्याकडे याबाबत शेतकऱ्यांनी तक्रार दाखल केली असता ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून अवैध वाळू वाहतूकीच्या गाड्या जातील त्यांच्यावर कारवाई केली जाईल व ज्या रस्त्यावर वाळू वाहतूक होत असेल त्या रस्तावर पाणी सोडा असा अजब सल्ला संबधित तलाठी यांनी दिल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

या नदीच्या पात्रालगत दररोज लाखो रुपयांची वाळूचा उपसा झालेला आहे व होत ही आहे. संबधित क्षेत्रातून बिनधास्तपणे वाळू उपसा होत असताना संबंधित फलटण महसूल विभागने कारवाई करणे गरजेचे असताना महसूल विभागाने बघ्याची भूमिका घेतली आहे.  नदीच्या पात्रात व लगतच्या शेतात मोठ-मोठे खड्डे पडले असून नदीचा प्रवाही बदलला असल्याने शेतकऱ्यांना ही धोका निर्माण होऊन अपघात होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या परस्पर जबरदस्ती रात्रीच्या वेळी वाळू उपसा होत आहे त्यामुळे या वाळू माफियांवर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे.


जिल्हाधिकाऱ्यांनी भेट देण्याची मागणी

फलटण तालुक्यातील ज्या भागात अवैध वाळू उपसा होत आहे त्या ठिकाणी भेट देण्याची मागणी त्या भागातील शेतकऱ्यांच्याकडून होत आहे. जिल्हाधिकारी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागले असून नुसते सूचना व फोनाफोनी न करता वाळू उपसा होणाऱ्या या भागातील मंडलाधिकारी व तलाठी याची चौकशी करण्याची व
धडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

No comments:

Post a Comment