Ticker

6/recent/ticker-posts

श्रीराम कारखाना व अर्कशाळा निवृत्त कामगारांचे उपोषण मागे (ताजी बातमी)

फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
- गेली 6 ते 7 वर्षा पासुन श्रीराम सहकारी साखर कारखाना व अर्कशाळा विभाग येथुन निवृत्त झालेल्या कामगारांचे थकीत पगार व इतर येणे बाकी मिळत नसल्याने आज सकाळ पासून  प्रजासत्ताक दिनी दिं.26 जानेवारी रोजी अधिकार गृहासमोर आमराण उपोषणास बसले होते या आंदोलनात काँग्रेस व भाजपने उडी घेतली असून संबांधित कारखाना प्रशासनाच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात आले यानंतर हे आंदोलन चिघळण्याची शक्यता निर्माण झाली होती. यानंतर पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब शेंडे व निवृत्त कामगार तसेच रणजितदादा निंबाळकर, दिगंबर आगवणे, सुशांत निंबाळकर, नरसिंह निकम, संदीप शिंगटे सहाय्यक पोलिस निरीक्षक, ज्ञानेश्वर दळवी पोलिस निरीक्षक, रत्नजी मोरे पोलिस हवालदार यांचे समवेत थकीत वेतनाबाबत चर्चा झाली यात कामगाराच्या 5 कोटीच्या एकूण देयक पैकी 2.5 कोटी रुपये 5 फेब्रुवारीला व उर्वरित रक्कम मार्च 2018 अखेर देण्याचे मान्य करण्यात आले याबाबत लेखी स्वरूपात आश्वासन देण्यात आले यानंतर निवृत्त कामगारानी आमरण उपोषण मागे घेतले.

Post a Comment

0 Comments