Ticker

6/recent/ticker-posts

वेळे येथील प्राथमिक शाळेत प्रतिक्षा पवार हिच्या हस्ते ध्वजारोहण

वेळे@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
69 व्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून वेळे येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील ध्वजारोहण याच शाळेतील विद्यार्थिनी कु.प्रतिक्षा दीपक पवार हिच्या हस्ते करण्यात आले. लेक वाचवा, लेक वाढवा या अभियानांतर्गत लेकींना प्रोत्साहन देण्यासाठी या शाळेतील शिक्षकांनी हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. गेल्या वर्षीही हा उपक्रम राबविण्यात आला होता.या उपक्रमाचे कौतुक पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी यांनीही केले.
ध्वजारोहण कार्यक्रम झालेनंतर कवायती सादर करण्यात आल्या. तसेच गुणवंतांचा पारितोषिक वितरण समारंभही घेण्यात आला. त्यानंतर खाऊ वाटप करण्यात आले.
या कार्यक्रमाला वेळे गावचे आजी माजी सरपंच, सर्व ग्रामपंचायत सदस्य, माध्यमिक शाळेतील विद्यार्थी व सर्व शिक्षक वृंद, अंगणवाडीचे विध्यार्थी व शिक्षक तसेच पालक व ग्रामस्थांनी लक्षणीय उपस्थिती लावली.

Post a Comment

0 Comments