कराड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील सोनापूर या गावाला भरघोस निधी दिला आहे.जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या प्रयत्नातून सुमारे 22 कोटी रुपयांची विकासकामे होऊ घातली आहे. शिवसेनेच्या माध्यमातून विकास कामाचा डोंगर कराड उत्तर विधानसभा मतदार संघात उभा राहतोय, अशी माहिती सेनेचे कराड उत्तर उपविभाग प्रमुख अमोल यादव यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
त्यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, कराड उत्तर विधानसभा मतदार संघात अनेक गावांचा विकास खुंटला होता. तालुका वेगळा आणि मतदार संघ वेगळा असे चित्र असल्याने याकडे डोळेझाक केली जात होती. नागठाणे जिल्हा परिषद गटात याची उदाहरणे पाहायला मिळत होती. आम्ही शिवसेनेचे माध्यमातून पक्षिय राजकारण बाजूला ठेऊन पालकमंत्री विजयबापू शिवतारे यांनी सांगितलेल्या सूचनेनुसार फक्त सेनेचे लेटर पॅड वर प्रस्ताव द्या. निधी देण्याचे काम माझे. तसेच सेनेचे उपनेते प्रा. नितीन बानूगडे-पाटील सरांच्या मार्गदर्शनेनुसार आम्ही जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांच्या प्रयत्नातूम पाठपुरावा करत राहिलो.
नागठाणे पासून पाच किलोमीटर अंतरावर डोंगर कुशीत वसलेल्या सोनापूर गावासाठी जनसुविधेतून नवीन ग्रामपंचायत इमारत बांधणे 10 लाख रुपयांचा निधी मंजूर, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनामधून नागठाणे ते सोनापूर रस्त्यासाठी 3 कोटी मंजूर करून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. तसेच पालकमंत्री शिवतारे बापू यांनी दिलेल्या शब्दनुसार लघु पाट बंधारे तलाव लवकर मार्गी लावणार आहेत. त्यासाठी 18 कोटी रुपयांचा निधी देऊ केला आहे.जिल्हा नियोजन मधून सोनापूर अंतर्गत रस्त्यासाठी 15 लाखाचे काम केले. ही कामे खेचून आणण्यासाठी जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव यांनी प्रयत्न केले. सरपंच पुष्पा नावडकर, उपसरपंच राहुल बागल, उमेश नावडकर, वैभव बागल यांनी सहकार्य केले. केवळ सेनाच विकासकामे करू शकते, असेही अमोल यादव यांनी म्हटले आहे.
No comments:
Post a Comment