'शहाजीराजे"च्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप - सत्य सह्याद्री

ठळक

Sunday, January 14, 2018

'शहाजीराजे"च्या श्रमसंस्कार शिबिराचा समारोप


सि.कुरोली @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
गेले ७ दिवस सुरु असणाऱ्या राष्ट्रीय सेवा योजना शिबीराचा समारोप समारंभ उत्साहात पार पडला. या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणुन माजी विभागीय आयुक्त मा.प्रभाकर देशमुख त्याच बरोबर माण खटावचे आमदार मा.जयकुमार गोरे, पंचायत समितीचे सभापती मा.संदिप मांडवे उपस्थित होते, कार्यक्रमाचे अध्यक्ष पद महाविद्यालयाच्या प्राचार्य संजय पाटील यांनी भूषविले.
या शिबीराचे आयोजन शहाजीराजे महाविद्यालय, खटाव व सारथी सामाजिक विकास संस्था, सिध्देश्वर कुरोली यांनी केले होते. समारोप समारंभात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मा.प्रभाकर देशमुख यांनी शाश्वत शेती, व्यवसाय मार्गदर्शन या विषयांना स्पर्श केला. प्रखर इच्छा शक्ती तुम्हाला यश मिळवुन देईल असे प्रतिपादन त्यांनी केले.
कार्यक्रमात महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्याच बरोबर कुरोलीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविद्यालया तर्फे अक्षय वायदंडे तर सारथी तर्फे अभिषेक जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. प्रा.प्रमोदिनी कांबळे यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment