फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
अक्षत नगर कोळकी ता.फलटण येथील काल दि.26 रोजी रात्रीच्या दरम्यान घरफोडी करून बेडरूम मधील कपाट फोडून चोरी झाल्याची घटना घडली आहे.
या बाबत घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार अक्षतनगर येथील आनंदराज गुरव यांचा बंगला नं.97 ते सुट्टी निमित्ताने बाहेर गावी गेले असल्याने दि.26 रोजी मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी चोरी केली असून अजून पोलीस घटनास्थळी पोहोचले नसल्याने व घरमालक गुरव हे परगावी असल्याने नक्की किती मुद्देमालासह इतर चोरीचा तपशील समजला नसून ही चोरी अत्यंत शहरापासून जवळ असलेल्या कोळकी येथील प्रतिष्ठित अशा अक्षतनगर येथे घडल्याने सर्वांचेच धाबे दणाणले आहेत.

0 Comments