फलटण@ विक्रम चोरमले
बेंगलोर वरून पुणेकडे पाईप घेऊन जाणारा ट्रक कोळकी हद्दीतील विडणी नजीक राव रामोशी पुलावर पलटी झाला असून चालक जखमी व किन्नर यात किरकोळ जखमी झाले आहेत.
या बाबत अधिक माहिती अशी की आज दि.27 रोजी सकाळी 7 वाजता KA-28-B- 3628 हा आशिर्वाद कंपनीचे युपीव्हीसी पाईप घेऊन बेंगलोर वरून पुणेकडे निघालेल्या ट्रकला वळणाचा अंदाज न आल्यामुळे साईडच्या बरेकेट वर पलटी झाला या मध्ये समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. या मध्ये चालक चंद्रकांत तुकाराम हरजन वय- 43, राहणार-चंडचंद, तालुका-इंदी, जिल्हा- विजापूर व किन्नर गणपत तुकाराम अहिवळे वय-25, राहणार-कंचनाळ, तालुका-इंदी, जिल्हा-विजापूर हे किरकोळ जखमी झाले आहेत.
सार्वजनिक बांधकाम विभागास कधी जाग येणार
कोळकी हद्दीतील विडणी नजीक पुणे-पंढरपूर महामार्गावरील राव रामोशी पुलावर आज अखेर अनेक अपघात झालेत यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. आजअखेर इतके अपघात होऊनही या ठिकाणी दोन्ही बाजूस असणाऱ्या धोकेदायक वळण काढण्याबाबत आजअखेर कोणतीच ठोच उपाययोजना सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडून करण्यात आली नाही. मागील एक महिन्यात तीन अपघात या ठिकाणी होऊनही बांधकाम विभाग झोपलेल्या अवस्थेत आहे. सदर ठिकाणी महामार्गवर असणारे धोकादायक वळण काढून हा रस्ता सरळ करावा अशी मागणी अनेकवेळा नागरिकांनी केली परंतु संबधित विभागाची उदासीन भूमिका आज अखेर बदलली नाही. आजून किती अपघात झालेवर संबधित विभाग जागा होणार असा सवाल नागरिक विचारत आहेत.
पुलावरील संरक्षण कठडे गायब
कोळकी हद्दीतील विडणी नजीक पुणे-पंढरपूर महामार्गावरील राव रामोशी पुलावर संरक्षण कढडे नसून ज्या ठिकाणी संरक्षण लोखंडी संरक्षण कठडे नाहीत तत्काळ बसवणे गरजेचे आहे.

0 Comments