म्हसवड@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
म्हसवड येथील क्रांतिवीर शैक्षणिक संकुल येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.हा कार्यक्रम संकुलातील आत्मगिरी माध्यमिक विद्यालय यांनी आयोजित केला होता.
यावेळी संस्थेच्या सचिव व मुख्याध्यापिका सुलोचना बाबर,पूनम जाधव,प्राचार्य विठ्ठल लवटे, मुख्याध्यापक अनिल माने,राहुल फुटाणे आदी प्रमुखमान्यवर उपस्थित होते. यावेळी प्राचार्य विठ्ठल लवटे बोलताना म्हणाले महाराष्ट्राच्या इतिहासाला कलाटनी देणाऱ्या, स्वराज्याची स्वप्न साकारणाऱ्या,सर्व मराठी माणसांच्या रक्तात स्वाभिमान भिनवला प्रत्येक मावळ्यात शिवबा घडवला,ज्यांनी आपले उभे आयुष्य या स्वराज्याच्या जडण घडनीसाठी पणाला लावले,शिवरायांच्या मातृत्व बरोबरच गुरुत्वही स्वीकारले अशा कर्तुत्ववान “राजमाता जीजाऊ” मासाहेबांची जयंती.त्याच बरोबर बुद्धिवंत ,कीर्तिवंत ,निष्ठावंत व आपल्या अमूल्य विचाराने जगातील युवा पिढीला जीवन जगण्याच्या सुंदर मंत्र देणारे स्वामी विवेकानंद यांची आज जयंती युवा दिन म्हणून साजरा करत आहे.अशा या दोन महामानवाचा सर्वांनी आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाज्यामध्ये ताठ मानेने उभे राहिले पाहिजे.जीवनात उच्च ध्येय गाठायचे असेल तर ज्ञानाचा साठा करणे गरजेचे आहे.ज्ञानाचा योग्य ठिकाणी वापर करून जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन त्यांनी केले.यावेळी विद्यालयातील स्नेहा पिसे,आदित्य शिर्के,प्रज्ञा पिसे,यशोधन माने,मानसी कांबळे,संदीप शिर्के,करुणा गोरड यांनी आपले मनोगत व्यक्त केले
या कार्यक्रमाच्या प्रसंगी संकुलातील सर्व शिक्षक ,शिक्षिका व विद्यार्थी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा लवटे आणि कोमल पिसे यांनी केले तर आभार मानसी साळुंखे हिने मानले.
No comments:
Post a Comment