सातारा, दि. 12 (जिमाका) : जिल्हा माहिती अधिकारी यवुराज पाटील यांची ऐतिहासिक पर्यटन मालिका 16 फेब्रुवारी ते 15 मार्च 2018या कालावधीत सातारा आकशवाणी केंद्रावरुन प्रसारित करण्यात येणार आहे.
या मालिकेमध्ये जिल्हा माहिती अधिकारी श्री. पाटील यांनी ज्या गोष्टी आरशात, प्रकाशात नाहीत अशा गोष्टी म्हणजेच जिल्ह्यातील किल्ले, ठिकाणे, पर्यटन स्थळे, ऐतिहासिक व्यक्ती अशा विविध बाबींवर प्रकाश टाकला आहे. मालिकेचे नुकतेच आकाशवाणी केंद्रामध्ये ध्वनीमुद्रण करण्यात आले आहे.
ही मुलाखत ऐतिहासिक पर्यटन मालिका या नावाने दि. 16 फेब्रुवारी ते 15 मार्च 2018 या कालावधीत सातारा आकाशवाणी केंद्रावरुन सकाळी 6 वाजून 50 मिनिटांनी प्रसारित करण्यात येणार आहे.
No comments:
Post a Comment