म्हसवड @ धनंजय पानसांडे
येथील श्री.सन्मती सेवा दलाच्या 'श्री सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियान'ची 'द गोल्डन बुक ऑफ़ वर्ल्ड रेकॉर्ड' ने घेतली दखल घेऊन या स्वच्छता मोहिमेची 'गोल्डन बुक' मधे विश्वविक्रमी स्वच्छता मोहीम म्हणून नोंद केली असल्याची माहिती सन्मती सेवा दलाचे डॉ.राजेश शहा यांनी दिली.
गोल्डन बुक ऑफ़ वर्ल्डचे एशिया हेड डॉ.मनीष वैष्णोई यांनी दिल्ली येथुन येऊन येवून झारखण्ड राज्यातील 'श्री.सम्मेद शिखरजी' पहाड़ावरील या दलाची प्रत्येक वर्षी केली जात असलेली स्वच्छता मोहीमेची पाहणी केली व गोल्डन ऑफ़ वर्ल्ड बुक मधे नोंद केल्याचे प्रमाणपत्र सन्मती सेवा दलास दिले.
यंदाही या स्वच्छता अभियानात पुणे, सातारा,नगर उस्मानाबाद जिल्ह्यातील सुमारे ३२६ जैन युवक- युवती व जैनधर्मीय स्वखर्चाने दुरचा प्रवास करुन या स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते.
सोलापूर,पुणे,नगर सातारा,उस्मानाबाद या जिल्ह्यासह महाराष्ष्ट्रातील जैन धर्मियांचे व युवक युवतींचे प्रतिनिधित्व करणा-या या श्री. सन्मती सेवा दल संघटना गेल्या सहा वर्षांपासून अखंडीत श्र.तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी स्वच्छता अभियान राबवित आहे .या उपक्रमास जैन धर्मियासह इतर धर्मातीलही युवक- युवतीचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे.यंदाचे हे सातवे वर्ष आहे.
जैन धर्मियांची काशी म्हणून ओळखले जाणारे झारखण्ड राज्यातील हे तीर्थक्षेत्र सम्मेद शिखरजी सर्व परिचित आहे.
श्री.सम्मेद शिखरजीची एकदा तरी वंदना करण्याचे प्रत्येक जैन बांधवाचे स्वप्न असते पण ते खर्चिक असल्याने काहिंचे ते स्वप्न पूर्ण होत नाही ,ही गोष्ट लक्षात घेवून व स्वच्छतेचे महत्व जाणून श्री सन्मती सेवा दलाने "स्वच्छतेतुन ईश्वरभक्तिकडे"हे धोरण अवलम्बवुन स्वच्छता अभियान सुरु केले. या माध्यमातून ग्रामीण भागातील जैन धर्मियासाठी शिखरजीची वंदना करण्याचे स्वप्न सन्मती दलाने सत्यात उतरवले.आज पर्यन्त स्वच्छता अभियानाच्या निमित्ताने हजारो जैन बांधवांची अल्प दरात या उपक्रमाच्या निमित्ताने श्री.सम्मेद शिखरजी यात्रेचा लाभ मिळु लागला. यापुढील काळातही हे कार्य अखंडित चालु राहणार असल्याचेही गांधी यांनी सांगितले.
हे स्वच्छता अभियान यशस्वीतेसाठी विद्यमान अध्यक्ष नवजीवन दोशी, उपाध्यक्ष निनाद चंकेश्वरा, महावीर दोशी,संयोजक सन्देश गांधी,जिनेंद्र दोशी ,मयूर गांधी हे डाँ राजेश शहा सुजय दोशी रविद्र शहा संजय दोशी अतुल दोशी विजयकुमार दोशी इत्यादी सर्व भागातील सन्मती दलाचे सदस्य सभासद आदींनी परीश्रम घेतले.या स्वच्छता अभियानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे अभियान यात्रा काळात हे स्वयंसेवक जेथे जेथे थांबतात,
तेथीलही स्वच्छता करतात ,तसेच जाण्या येण्याच्या प्रवासात आपन केलेला कचरा स्वतः उचलून फेकून देतात असेही त्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment