सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा बसस्थानक परिसरात सायंकाळच्या सुमारास अनेक नागरिकांच्या डोळ्यातून अचानक ‘अश्रू’ वाहू लागल्याने परिसरात अचानक खळबळ उडाली.
सायंकाळी या परिसरात असणार्या नागरिकांना डोळ्यातून पाणी येऊ लागल्याने नेमके काय झाले ते कळेचना. या परिसरात कोणतीही वायूगळती होण्याची शक्यताही नसल्याने गटारातील दुर्गंधीतून तयार झालेल्या अॅसिडयुक्त वायूमुळे कदाचित असे झाले असावे असा अंदाज व्यक्त होत होता. कोणीतरी याबाबत पोलिसांना माहिती दिल्याने पोलीसही परिसरात पोहोचले. त्यांच्याकडून रात्री उशिरापर्यंत पाहणी सुरु होती.
दरम्यान, बसस्थानकाच्या शेजारीच पोलीस परेड ग्राऊंड आहे. या ठिकाणी सरावादरम्यान पोलिसांकडून अश्रूधुराची नळकांडी फोडली गेली असावीत, असा अंदाज होता. मात्र, या माहितीला दुजोरा मिळू शकला नाही.
मात्र या वायूमुळे अनेकांचे डोळे चरचरत होते व अश्रू वाहात होते.
No comments:
Post a Comment