कराड@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड-पाटण-हेळवाक रस्त्याच्या रुंदीकरणामध्ये सुरु असलेल्या बेसुमार वृक्षतोडीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शनिवारी आक्रमक पावित्रा घेतला. ही वृक्षतोड जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे यांच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यांनी बंद पाडली.
कराड-पाटण-हेळवाक रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरु आहे. या कामामध्ये रस्त्यालगतची पूर्ण झाड़े तोडण्याचे काम सुरु आहे. जी झाडे रस्त्याला अडथळा ठरत नाहीत ती तोड़ू नये यासाठी ‘स्वाभिमानी’ कार्यकर्ते आक्रमक होते. सचिन नलावडे म्हणाले, ग्लोबल वार्मिंग मुळे पावसाचे प्रमाण कमी झाले असून शासन कोटि वृक्ष लागवाडीचा कार्यक्रम घेत आहे. त्यासाठी कोटि रुपये खर्च होत असताना येथे मात्र मोठ मोठ्या जुन्या झाडांचे 200 ते 300 रुपये मूल्यांकन करून झाडे तोडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे यात शासनाचा महसूल बुडाला आहे.
आधीच कोयना परिसर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात मोडत असताना जी झाडे वाचवता येणे शक्य आहे.
दरम्यान, पाटण चे पोलीस निरीक्षक मांजरेकर साहेब यांनी कंपनी अधिकारी व संघटाना प्रतिनिधी यांची बैठक घेवून कंपनीला राष्ट्रीय महामार्ग विभागाशी संपर्क साधून माहिती देण्याच्या सूचना केल्या.
यावेळी जिल्ह्याध्यक्ष सचिन नलवडे, कराड तालुकाध्यक्ष राजू पाटील, पाटण तालुकाध्यक्ष कृष्णा क्षीरसागर, पाटण शहराध्यक्ष विकास हादवे, पाटण शहर अध्यक्ष अमर कदम योगेश झाम्बरे व कार्यकते उपस्थित होते.
No comments:
Post a Comment