फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
निरा नदी पात्रात केमिकल मिश्रीत पाणी सोडल्याने नदी पात्रातील जलचर प्राण्यावर यांचा परिणाम होऊन जलचर प्राणी मृत झाले असुन यामुळे खुंटे व लाटे परिसरात दुगंधी पसरली आहे तर अनेक मृत माशाचें थवेच्या थवे पाण्यावर तरंगत असल्याने पाणी दुषित झाले आहे.
या बाबत अधिक माहीत अशी की, निरा नदीचे संपुर्ण अधिकार हे पुणे जिल्हा परिषदेचकडे आहेत मात्र हा विभाग निरा नदीच्या अनेक शेतकर्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असुन संबधित कोणी हे केमिकल मिश्रीत पाणी पाणी निरा नदीपात्रात सोडले यांची माहीती प्रदूषण विभाग यांनी घेऊन संबधीत कंपनीवर कडक कारवाई करण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे. हे केमिकल मिश्रीत पाणी सोडल्याने निरा नदीवर अनेक गावांचे पिण्याचे पाणी पुरवठा केंद्रे जवळच आहेत यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो तरी ताबतोब निरा नदी पात्रातील पाण्याचे नमुणे तपासुन कोणी हे केमिकल नदीत सोडले याची माहीत घेऊन संबधितावर कारवाईची मागणी नदी काठच्या शेतकर्यांनी केली आहे.

0 Comments