फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क :- राजुरी तालुका फलटण येथील राजुरी चौफुला व गावातील तीन ते चार लोकांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे. त्यामुळे राजुरी व परिसरात या पिसाळलेल्या कुत्र्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेली दोन दिवस झाले हे कुत्रे या परिसरात फिरताना लोकांना दिसत आहे. यामुळे राजुरी व परिसरात मोठ्या प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्याचा ग्रामस्थ शोध घेत आहेत पण पिसाळलेला कुत्रा सापडला नाही. तरी संबंधित विभागाने पिसाळलेल्या कुत्र्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येत आहे.
0 Comments