Ticker

6/recent/ticker-posts

राष्ट्रीय ग्रामीण फुटबॉल स्पर्धेत गौरव वाडकरला सुवर्णपदक


फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
इस्लामपुर येथे तिसरी ग्रामीण फुटबॉल स्पर्धा दिनांक 20 व 21 जानेवारी 2018 रोजी संपन्न झाली यात वाठार निंबाळकर येथील गौरव गणपत वाडकर यांस सुवर्ण पदक मिळाले.

दिनांक 20 व 21 जानेवारी 2018 रोजी तिसरी ग्रामीण फुटबॉल स्पर्धा संपन्न झाली ही स्पर्धा 14 वर्षाखालील मुलासाठी आयोजित करण्यात आली येथे तालुका इस्लामपुर ग्रामीण असोसिएशनच्या वतीने साकराळे तालुका इस्लामपुर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गौरव  गणपत वाडकर राहणार वाठार निंबाळकर तालुका फलटण याने या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळविले. अंत्यत चिकाटी व मेहनतीच्या जोरावर गौरव  यांने हे यश संपादन केले आहे.गौरव वाडकर बारामती येथील शारदा ताई पवार विद्या निकेतन शारदानगर येथे शिकत असून गैरव यांस क्रीडाशिक्षक, मुख्याध्यापक, पालक व मित्रपरिवार यांचे मार्गदर्शन लाभले.

 गैरवच्या या निवडीबद्दल माझी खाजदार हिंदुराव नाईक निंबाळकर, युवा नेते व कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितदादा नाईक निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य जिजामाला नाईक निंबाळकर, स्वराज्य संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments