परळी@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कारी (ता.सातारा) येथे शनिवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास एका चोरट्याने भरदिवसा मुख्य चौकातील दोन घरे फोडून सुमारे 10 हजाराचा ऐवज लंपास केला आहे. यावेळी दोघांनी त्याचा पाठलाग केला मात्र, तो पसार झाला. अशा घटना दिवसा ढवळ्या घडत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की, शनिवारी सकाळी 11 च्या सुमारास कारी गावाशेजारी असणाऱ्या बैलेवस्ती येथील भाऊराव बैले यांचे घर बंद अवस्थेत असल्याचे पाहून दुचाकी वरून आलेल्या एका चोरट्याने त्यांचे कटावणीची सहाययने कुलूप तोडून घरातील वस्तू विस्कटून काही मौल्यवान वस्तू चोरून नेहल्या तर मुख्य चौकात असलेले अशोक लक्ष्मण पवार यांचे घर आहे. ते पुणे येथे असल्याने त्यांचे घर बंद होते. त्यात शेतातील कामे चालू असल्याने त्यांच्या शेजारील घरानाही कुलूप होते याचा फायदा घेत या चोरटयांने अशोक पवार यांच्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटातील किंमती वस्तू आणि साहित्य चोरून नेहले. चोरट्याने दोन्ही घरातील सुमारे 10 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला आहे. दरम्यान, पवार यांच्या घरात चोर शिरलेला एका महिलेने पाहिले होते. त्या एकट्याच असल्याने गावातील लोकांना बोलवून येईपर्यत चोर पसार झाला होता. यावेळी काही जणांनी त्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र, तो सोडला नाही.
गेल्या चार दिवसात या परिसरातील सोनवडी आणि गजवडी येथेही चोरीच्या घटना आहेत. दिवसा-ढवळ्या घडत असणाऱ्या घटनांमुळे महिलांसह लहान मुलेही बाहेर पडण्यास दजावत आहेत. यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर घटनेची नोंद रात्री उशिरापर्यंत सातारा तालुका पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
No comments:
Post a Comment