वरकुटे-म्हसवड@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
नुकत्याच घेण्यात आलेल्या तालुक्यातील रिक्त पोलीस पाटील पदाचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये माळवाडी येथील पोलीस पाटील पद ओबीसी प्रवर्गातील पुरूषासाठी आरक्षित होते. त्यासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत महेंद्र आगतराव ठेंगील यांना जास्त गुण मिळवल्याने त्यांची पोलीस पाटील या पदासाठी निवड निश्चित झाली आहे.
गेली अनेक वर्षे माळवाडी येथील पोलीस पाटील पद रिक्त होते. त्यामुळे प्रशासकीय कामात अडचणी निर्माण होत होत्या. माळवाडी येथील पोलिस पाटील पद भरावे याबाबत अनेकवेळा मागणी करण्यात आली होती.शासनाकडून नुकतीच परीक्षेद्वारे पोलीस पाटील पदाची भरती करणेत आली.त्या परिक्षेमध्ये माळवाडी येथील महेंद्र आगतराव ठेंगील यांना इतर उमेदवारांपेक्षा लेखी व तोंडी परिक्षेत १०० पैकी ८२.५० गुण मिळाल्याने त्यांची गावच्या पोलीस पाटील पदी निवड झाली.
महेंद्र ठेंगील यांची गावच्या पोलीस पाटील पदासाठी निवड झाल्याबद्दल माळवाडी,वरकुटे-म्हसवड परिसरातून समाधान व्यक्त केले जात आहे. महेंद्र ठेंगील यांच्या या निवडीबद्दल अनेक मान्यवरांनी तसेच ग्रामस्थांनी अभिनंदन केले.


0 Comments