Ticker

6/recent/ticker-posts

साम्राज्य प्रतिष्ठान ने दिली निराश्रीतांना मायेची ऊब




सातारा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
साम्राज्य प्रतिष्ठानने सामाजिक कार्यात विविध उपक्रम राबवून सातारा शहरात सामाजिक कार्याचा ठसा उमटविला आहे. प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष चिन्मय जंगम यांचे सामाजिक विचारांवर पाऊल टाकत आता प्रतिष्ठान युवती सभासदांनी ही सामाजिक कार्य करण्यात कंबर कसली व आई जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद जयंती निमित्त सातारा शहरातील गरजू बेघर लोकांसाठी मायेची ऊब म्हणजेच कपडे, ब्लॅकेट वाटप केले त्यासर्वांशी संवाद साधत त्यांचे अडचणी देखील लक्षात घेतल्या येत्या काळात त्यासर्वांसाठी असेच विविध उपक्रम हातात घेण्याचे ही ठरविले.






 या उपक्रमावेळी परीसरातील लोंकास सामाजिक कार्य आपण ही वेळोवेळी करत रहावे असे आव्हाण केले. हा उपक्रम राजवाडा येथे राबविण्यात आला. उपक्रमा वेळी साम्राज्य प्रतिष्ठान विश्वस्त कु.सायली त्रिंबके व युवती सभासदांमध्ये प्रणाली फडतरे, विद्या कांबळे, वैदेही निकम व प्रणाली फडतरे यांचे सहकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments