Ticker

6/recent/ticker-posts

फलटण येथील अनधिकृत बांधकामाबाबत गृहनिर्माण संस्थेच्या सर्व पदाधिकार्‍यांवर गुन्हा दाखल

फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क :- फलटण नगर परिषदेच्या भुखंडावरती  अतिक्रमण करून प्रकल्प उभारल्याच्या कारणामुळे सचिवासह गृहनिर्माण संस्थेसह सर्व पदाधिकार्‍यांवर प्रादेशिक नगर रचना व शहर विकास कायदा सन 1966 चे कलम 54(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबत फलटण शहर पोलिसांनी दिलेली माहीती अशी की, लक्ष्मीनगर फलटण येथील नगर भुमानप क्र 6468 पैकी प्लॅट नं 67 व 68 मध्ये अतिक्रमण करून बांधकाम सुरू केल्या प्रकरणी माळजाई सहकारी गृहनिर्माण संस्था व संस्थेचे सचिव मिंलीद गोविंद सहस्त्रबुध्दे राहणार लक्ष्मीनगर व संस्थेचे सर्व पदाधिकारी यांचे वर फलटण नगर परिषदेचे अधिकारी सुरेंद्र बाळकृष्ण काळेबेरे वय 52 व्यावसाय नोकरी राहणार भडकमकर नगर यांनी प्रादेशिक नगर रचना व शहर विकास कायदा सन 1966 चे कलम 54 (2) अंतर्गत दिं 3/4/2017 ते 24/1/2018 रोजी पर्यत वेळोवेळी बांधकाम केली असल्याची तक्रर केली असुन अधिक तपास पोलिस नाईक गार्डी हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments