वरकुटे-म्हसवड @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
जिजामाता प्राथमिक शाळेने अल्पावधीत परिसरात नाव लौकिक मिळवत आपली वाटचाल प्रगतीच्या दिशेने केली असल्याचे मत सपोनि मालोजीराव देशमुख यांनी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलना दरम्यान व्यक्त केले.
सुभद्राबाई जनाबाई शिक्षण संस्था संभुखेड संचलित जिजामाता प्राथमिक शाळा शिक्षक काॅलणी म्हसवड या शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हसवड पोलिस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष विजय धट, पालिकेचे विरोधी गटाचे नगरसेवक अकील काझी, संजय सोनवणे,पञकार एल के सरतापे,अहमद मुल्ला, संस्थेचे अध्यक्ष विलासराव देशमुख,संदिप साबळे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष पदावून बोलताना सपोनि देशमुख म्हणाले विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर शाळेचा विकास कळतो या शाळेची गुणवत्ता शाळेला योशोशिखरावर नक्की नेहणारी आहे या शाळेच्या बालचिमुनी विविध स्पर्धा मध्ये मिळवलेले धवल यश हे शिक्षकानी केलेल्या कामाचे श्रेय आहे हे विद्यार्थ्यांचे यश व शिक्षकाची गुणवत्ता या शाळेला प्रगतीकडे घेवून जाणारी आहे असे सपोनि देशमुख म्हणाले.
यावेळी माजी नगराध्यक्ष विजय धट म्हणाले या शाळेची थोड्या दिवसातील विकासात्मक वाटचाल प्रगतीपथावर असून लवकरच या शाळेचा वटवृक्ष होवू असी सदिच्छा व्यक्त केली.
त्यावेळी शाळेचे सचिव बापुराव मोहिते यानी शाळेच्या प्रगतीचा आढावा सांगितला या कार्यक्रमाचे सुञसंचलन निलेश सरतापे यानी तर आभार संदिप साबळे यामनी मानले.
यावेळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी विविध गिते सादर केली तर विविध स्पर्धेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपञ देवून गौरव करण्यात आला.
No comments:
Post a Comment