कराड@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
केंद्र व राज्य सरकारची महत्वकांक्षी योजना असलेले अभियान स्वच्छ सर्वेक्षण 2018 अंतर्गत कराड नगरपरिषदेचा सर्वात कमी वयाचा स्वच्छता राजदूत रेहान शकील नदाफ याचे व्याख्यान मंगळवारी रामविलास किसनलाल लाहोटी कन्या प्रशाला येथे आयोजित करण्यात आले होते.
छोटया रेहान शकील नदाफ याचे वय 5 वर्ष 9 महिने इतके असून आजून त्याला लिहता अगर वाचता येत नाही तरी सुध्दा सुमारे 100 विषयांवर तो न अडखळता व्याख्याने देत असतो.तो कोल्हापूर जिल्हा विधी व न्याय विभागाचा ब्रॅंड अँबेसीडर असून,कराड नगरपरिषदेच्या स्वच्छता राजदूतपदी त्याची निवड करण्यात आलेली आहे. नगरपरिषदेच्या वतीने स्वच्छता या विषयावर आज त्याचे व्याख्यान झाले यावेळी बोलताना त्याने स्वच्छतेची आवड लहानपणापासून मनावर बिंबवणे आवश्यक असल्याचे सांगून प्रत्येकाने शौचालयाचा वापर करावा, रस्त्यावर केर कचरा न टाकता तो घंटागाडीमध्येच टाकावा. ओला व सुका कचरा कोणत्या प्रकाराचा असतो याबददल त्याने माहिती दीली. आपल्या घरापासूनच स्वच्छतेची सुरवात झाल्यास आपले गाव स्वच्छ होण्यास वेळ लागणार नाही असेही तो म्हणाला. अस्वच्छतेमुळे कोणकोणते दुष्परिणाम मानवी जीवनावर होऊ शकतात यावर त्याने विस्तृत विवेचन केले. तसेच कराड शहर स्वच्छ होण्यासाठी नगरपरिषदे मार्फत कोणकोणत्या उपाययोजना राबविल्या जात आहेत याचीही माहिती त्याने दिली. नागरीकांनी सजगता बाळगुन या उपाययोजनांचा लाभ घ्यावा असेही तो म्हणाला. अतिशय लहान वयात त्याच्या प्रग्लभ बुध्दीने व सदर विषयावरील प्रभुत्वाने त्याने सर्वाना अश्चर्यचकित केले. या प्रसंगी उपस्थित असणा-या कन्याप्रशालेच्या विदयार्थीनींनी व इतर उपस्थितांनी टाळयांचा कडकडाट करुन त्याच्या व्याख्यानाला भरभरुन दाद दिली. यानंतर टिळक हायस्कूल कराडच्या विदयार्थ्यांनी स्वच्छता विषयक नाटीका सादर केली.
सुरुवातीला स्वच्छता दुत डॉ.वाळींबे यांनी कार्यक्रमाचे प्रास्तावीक केले तर प्राध्यापक खोत सर यांनी रेहानचा परिचय करुन दिला. कन्या प्रशालेच्या वतीने सर्व मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे यांचे हस्ते छोटया रेहानचा व टिळक हायस्कूलच्या नाटीका सादर करणा-या विदयार्थ्यांचा व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी कराड नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती सौ.प्रियांका यादव,जेष्ठ नगरसेवक श्री.विनायक पावसकर,श्री.घनश्याम पेंढारकर, नगरसेविका सौ.स्मिता हुलवान,सौ.विदया पावसकर,सौ.अंजली कुंभार, विरोधी पक्षनेते श्री.सौरभ पाटील, यांचेसह श्री.फारुकभाई पटवेकर, सौ.वाळिंबे,कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापीका, सर्व शिक्षीका,कराड नगरपरिषदेचे अधिकारी कर्मचारी यांचेसह सर्व स्वच्छता दुत व परीसरातील नागरीक बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री. शानबाग सर यांनी केले.
No comments:
Post a Comment