फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
ग्रामीण भागातील सर्व सामान्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी ईश्वरकृपा शिक्षण संस्थेच्या वतीने ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूलने गुणवरे सह आसपासच्या गावातील मुलांना अतिशय चांगले शिक्षण दिले याच बरोबर खेळातील प्राविण्य दाखवण्यासाठी स्पोर्ट डे चे आयोजन करून मुलांच्यात असणाऱ्या सुप्त गुणांना वाव दिला असल्याचे मत बरड दुरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान बुरसे यांनी काढले आहेत.
ब्लूम इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने आयोजित स्पोर्ट डे चे आयोजन केले होते या वेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.या वेळी ईश्वर गावडे,सातारा परिवहन विभागाचे वाहन निरीक्षक संभाजी गावडे,-सौ.साधनाताई गावडे उपस्थित होते.या वेळी भगवान बुरसे म्हणाले की गुणवरे सह या भागातील अनेक गावातील मुलांच्या भवितव्याचा विचार करून या शाळेची स्थापना केली यामुळे सामान्यांच्या मुलांना इंग्रजी माध्यमातून शिकण्याची सुवर्ण संधी प्राप्त केली या शाळेमुळे ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमातून आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण तर मिळालेच या बरोबर मुलांच्या खेळातील सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी स्पोर्ट डे चे आयोजन करून धावणे, कबड्डी, लांब उडी, बेडूक उडी, लिंबू चमचा या सारख्या स्पर्धा मधून व्यायामाचे महत्व पटवुन दिले या मुळे शिक्षणाच्या वयातच मुलांना खेळाची माहिती करून दिली व त्यांना आपल्यातील खेळाडूचे दर्शन देण्याचे व्यासपीठ दिले हीच लहान लहान मुले भविष्यात मोठे अधिकारी होऊन या आपल्या गुणवरे गावचे नाव सुवर्ण अक्षराने भारताच्या नकाशावर कोरतील असा विश्वास बुरसे यांनी व्यक्त केला या वेळी विविध स्पर्धेतील भाग घेणाऱ्या मुलांना गौरवण्यात आले व विविध बक्षिसे देण्यात आली.
ब्लूम इंग्लिश मिडीयम च्या मुलांनी खेळामधून आपले कौशल्य दाखवले या मधील मुलांच्या व मुलींच्या मधील कब्बडीच्या सामन्यात नेत्रदीपक असे कौशल्य दाखवले या वेळी जेष्ठ पत्रकार अरविंद मेहता, प्रा.रमेश आढाव, युवराज पवार, विक्रम चोरमले, वैभव गावडे, राजू गोफने व पालक, ग्रामस्थ, शिक्षक, शिक्षिका व विविध मान्यवर उपस्थित होते.
No comments:
Post a Comment