दौंडेवाडीतील धोकादायक आड बुजवण्यात प्रशासनाची टाळाटाळ, ग्रामस्थांची जिल्हाधिकार्‍यांकडे धाव - सत्य सह्याद्री

ठळक

Thursday, January 11, 2018

दौंडेवाडीतील धोकादायक आड बुजवण्यात प्रशासनाची टाळाटाळ, ग्रामस्थांची जिल्हाधिकार्‍यांकडे धाव


सातारा@ सत्य सह्याद्री  वृत्तसेवा 
गावच्या सार्वजनिक आडात वैयक्तिक शौचालयाचे पाणी सोडणार्‍यांना प्रशासन पाठीशी घालत असल्याचा प्रकार असून विस्तार अधिकारी, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेकडून काहीच कारवाई होत नसल्याने ग्रामस्थांनी आता याप्रकरणी जिल्हाधिकार्‍यांकडे धाव घेतली आहे.
याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, गादेवाडी ग्रामपंचायत हद्दीत मौजे दौंडेवाडी येथे सार्वजनिक आडामधे वैयक्तीक शौचालयाचे ड्रेनेज सोडण्यात आले होते. ‘आपले सरकार पोर्टलवर 20 महिन्यापासून याबाबातच्या तक्रारीचा पाठपुरावा चालू आहे. त्यामुळे ग्रामपंचायत ने कारवाई केली असे दर्शविण्यासाठी 13/8/2017 रोजी फक्त आडावरील स्लॅब तोडून ड्रेनेज बंद करण्यात आले होते.
आडावरील स्लॅब तोडल्यामुळे ड्रेनेजची दुर्गंधी पसरली असून ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. या आडावर स्लॅब तोडून झाडांच्या फांद्या टाकून आड झाकला आहे. सदर आड 35 ते40 फुट खोल असून जमीन लेवल बरोबर आहे तसेच आड शौचालयाच्या पाण्याने ने पुर्णपणे भरलेला आहे. आरोग्यास घातक आहे. सदर आड रस्त्याच्या बाजूला असुन लहान मुले तसेच जनावरे आडामधे पडून जीवित वित्त हानी होऊ शकते तरी सुद्धा ग्रामपंचायत प्रशासन जानिवपुर्वुक दुर्लक्ष करत आहे.
आडाच्या बाजूला एका प्रतिष्ठीत व्यक्तीचे शौचालय असून ते आतिक्रमण करुन सदर जागेवरच बांधले आहे त्यामुळे कारवाई टाळण्यासाठी ग्रामस्थांची आरोग्य व जिवितहानी होण्याची ग्रामपंचायत वाट बघत आहे का?13 /8/2017 ला आडावरील स्लॅब तोडला आहे तेव्हा पासून सदर जागेचा मोजणीला किती खर्च येईल हे पाहत आहेत का? आतिक्रमण करण्यार्‍या वक्तीच्या दबावाखाली येवून मोजणी करून आतिक्रमण हाटवुन सदर जागा ताब्यात घेऊन कंपाऊंड घालायला टाळाटाळ करीत आहेत का? जिवित हानी झाल्यावर प्रशासनाला जाग येणार का? जिवित हानी होण्याची वाट पाहात आहेत का? याला जबाबदार कोण? पंचायत समिती विस्तार अधिकारी की जे सत्य परिस्थिती पाहणी न करता आहवाल देऊन आतिक्रमण करण्यार्‍या वक्तीच्या पाठीशी उभे राहत आहेत?
मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सातारा कृपया आपण योग्य निर्णय घेवून ग्रामस्थांच्या आरोग्यास होणारा धोका व जिवितहानी टाळावी आणि सदर जागेवरच आतिक्रमण हटवून सदर आडामधील शौचालयाचे ड्रेनेज साफ करून सदर आड मुजवुन सदर आडाची जागा बंदीस्त करून ग्रामपंचायत ने लगेचच ताब्यात घ्यावी व आरोग्यास होणारा धोका व जिवितहानी टाळावी. 

No comments:

Post a Comment