Hot Posts

6/recent/ticker-posts

खटाव तालुक्यातील 15 छावणीचालकांवर गुन्हे दाखल (सविस्तर वृत्त यादीसह)


वडूज@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
करारनाम्यातील अटी शर्तीचे उल्लंघन केल्या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वडूज पोलीस स्टेशन अंतर्गत 15 चारा छावणी चालकांवर वडूज पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
खटाव तहसील कार्यालयाच्या अंतर्गत वडूज पोलीस स्टेशन हद्दीत येणार्‍या सन 12-13 व 13-14 या कालावधीत दुष्काळी परिस्थिती असल्याने शासनाकडून जनावरांच्या चारा साठी छावण्या तयार करण्यात आल्या होत्या. अशा 16 छावणी चालक यांच्यावर करारनाम्यातील अटींचे उल्लंघन केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश प्राप्त होताच प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे व तहसीलदार सुशील बेल्हेकर यांच्या मार्गदर्शनाखाली मंडलाधिकारी यांनी 15 जणांवर गुन्हे दाखल केले.
चारा छावणी,चालकाचे नाव, व गावाचे नाव
1) कै सदाबाई साबळे नारी निकेतन संस्था वडूज - बाळासो तुकाराम साबळे (वाकेश्‍वर छावणी, भुरकवडी छावणी).
2) अंबवडे विकास सेवा सोसायटी- विजय रामचंद्र पवार.
3) मांडवे विकास सेवा सोसायटी -राजुभाई अब्दुल मुलाणी (मांडवे).
4) सुशिक्षित बेकार सहकारी दूध संस्था सि कुरोली - शशिकला मुगुटराव देशमुख,
5) वडूज विकास सेवा सोसायटी - महादेव सीताराम गोडसे
6) पेडगाव विकास सेवा सोसायटी - सुखदेव केशव जगदाळे.
7) महालक्ष्मी सहकारी पाणी पुरवठा संस्था कातर खटाव - व्यंकट विष्णू बागल,
8) संकल्प स्वयंम रोजगार संस्था वडूज - परेश जाधव (धोंडेवाडी छावणी)
9) विकास सेवा सोसायटी बनपुरी - दिनकर किसन देवकर
10) विकास सेवा सोसायटी एनकुळ - सुभानराव दगडू खाडे
11) जयभवानी  विकास सेवा सोसायटी पळसगाव - मनोज लक्ष्मण पवार
12) श्रीराम सहकारी दूध संस्था कणसेवाडी - अंकुश श्रीपती खरमाटे
13) सोनारसिद्ध  विकास सेवा सोसायटी निमसोड - तात्याबा हणमंत मोरे (मरडवाक छावणी)
14) पिंपळेश्वर  सहकारी संस्था होळीचागाव - सुखदेव पांडुरंग मोहिते
15) राजीव विकास सेवा सोसायटी पडळ  - अर्जुनराव सानप
यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. यामुळे परिसरात चांगलीच खळबळ माजली आहे.

Post a Comment

0 Comments