Hot Posts

6/recent/ticker-posts

फलटणमध्ये पिशवीला हिसका देऊन 2 लाखांवर डल्ला


फलटण @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क  
फलटण शहरातील नरसिंह चौकातील खंडोबा मंदिर येथे दोन महिला चालत जात असताना मोटारसायकल वरती आलेल्या दोन तरुणांनी महिलेच्या हातातील पिशवीसह 1 लाख 99 हजार 500 रुपये हिसकावून चोरून नेले. ही घटना आज दुपारी 12 वाजण्‍याच्‍या सुमारास भर भाजारात घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, सौ.आशाताई आधिकराव वायफळकर, वय 50, राहणार सरडे ता. फलटण, या पती आधिकराव वायफळकर, मुलगा बाबासो आधिकराव वायफळकर व शेजारी राहणाऱ्या सुमनबाई गुलाबराव पाटणकर यांच्यासमावेत बँक ऑफ इंडिया शाखा फलटण येथून  आधिकराव वायफळकर यांच्या शेती महामंडळ येथून सेवानिवृत्ती नंतर मिळालेल्या रकमेपैकी 1 लाख 99 हजार रुपये काढले व गाडीमध्ये मोजले. यानंतर हे पैसे फलटण पोस्ट ऑफिस येथे दामदुप्पट करण्यासाठी टाकण्यासाठी प्याजो पोर्टर चारचाकी गाडी नं mh 11bl 4658 निघाले यानंतर नरसिंह चौकातील खंडोबा मंदिर रविवार पेठ फलटण येथे एका दुकानात चालत निघाले असताना त्यांच्या हातात असलेल्या पिशवीत 1 लाख 99 हजार 500 रुपये रक्कम व 10000 रुपये रकमेची मुदत ठेव पावती, पॅनकार्ड, आधारकार्ड, बॅंक ऑफ इंडियाचे पासबुक अशी कागदपत्रे असलेली पिशवी होती. यानंतर होंडा युनिकोन मोटर सायकल वरून आलेल्या दोन इसमापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने गाडीवरून खाली उतरून सौ.आशाताई आधिकराव वायफळकर यांच्या हातात असलेल्या 1 लाख 99 हजार 500 रुपये रकमेची पिशवी हिसकावून गाडीवरून पळ काढला. यानंतर सौ.आशाताई आधिकराव वायफळकर या मोठयाने ओरडल्याने त्याचा मुलगा दुकानातून बाहेर पळत आला व गाडीच्या मागे पकडण्यासाठी धावले परंतु दोन्ही इसम मोटरसायकलवरून उमाजी नाईक चौकाकडून पळून गेले.
   सौ.आशाताई आधिकराव वायफळकर यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेनंतर फलटण शहरात एकच खळबळ उडाली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास पी.एस.आय मुंडे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments