Ticker

6/recent/ticker-posts

पाटणकरांच्या साहित्य संमेलनाचे शंभुराजना निमंत्रण, जनतेत खुमासदार चर्चा



संजय कांबळे @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
स्वातंत्र्यसैनिक कै. बाळासाहेब तथा भडकबाबा पाटणकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दि 2 व 3 फेब्रुवारी रोजी सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष मा. विक्रमबाबा पाटणकर यांच्या वतीने पाटण येथे ग्रंथ महोत्सव व साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, या कार्यक्रमास माजी मंत्री विक्रमसिंह  पाटणकरांचे कट्टर विरोधक आमदार शंभुराजे देसाई यांना पहिल्यांदाच निमंत्रित करून विक्रमबाबा पाटणकर यांनी गुगली टाकली आहे, याची पाटण तालुक्यात खुमासदार चर्चा चालू आहे, या कार्यक्रमाला आमदार देसाईंसह भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, आमदार नरेंद्र पाटील, काँग्रेसचे हिंदुराव पाटील  यांचेसह रिपाई, मनसे या पक्षाचे पदाधिकारीही पहिल्यांदाच साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत, या संमेलनाच्या निमित्ताने पाटणच्या राजकारण वेगवेगळी राजकीय समीकरणे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे,

Post a Comment

0 Comments