Ticker

6/recent/ticker-posts

बनावट खातेउतारे, खरेदीदस्त करुन फसवणूक, नगरसेवकासह सातजणांची टोळी जेरबंद


मेढा@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
बनावट खातेउतारे, बनावट खरेदीदस्त तयार करुन शासनाची तसेच नागरिकांची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने मेढ्याच्या नगरसेवकासह सात जणांच्या टोळीस जेरबंद केले.
संभाजी रावसाहेब घाटगे (वय 57), दिलीप भुवाल सहानी (वय 27), नितीन भानुदास काळे (वय 34, सर्व रा. सैदापूर, ता. सातारा), भरत नामदेव सूर्यवंशी (वय 32 रा. लांडेवाडी, औंध, खटाव), राहूल आनंदा धनावडे (वय 28, रा. विवर, हातगेघर, ता. जावली), सारीका राजेंद्र जाधव (वय 37, रा. अंबवडे खुर्द ता. सातारा) व सतीश विष्णू पंडीत (वय 51, रा. तहसील कार्यालयासमोर मेढा) अशी अटकेत असलेल्या संशायितांची नावे आहेत. यातील सतीश पंडीत हा मेढा नगरपंचायतीत नगरसेवक आहे.
या संशयितांनी तेटली (ता. जावली) येथील जाजमनीचे बनावट हस्तलिखीत खातेउतारे, फेरफार उतारे, बनावट ओळखपत्र तयार केली. इंटनेटवरील शासकीय साईट हॅक करुन खरेदीदस्त करुन देऊन कोयना प्रकल्पामधील शासनाने आरक्षीत केलेली जमीन व अस्तित्वात नसलेल्या जमिनीचे खरेदीदस्त करुन देऊन शासनाची तसेच खरेदीदारांची फसवणूक केली. या संदर्भात मेढा पोलिसांत दोन गुन्हे दाखल आहेत. त्याचा तपास पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी केला. सर्व संशयितांना आज मेढा न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्यांची चार दिवसांसाठी पोलीस कोठडीत रवानगी केली.

Post a Comment

0 Comments