Hot Posts

6/recent/ticker-posts

भाजपा युवा मोर्चा खटाव तालुका अध्यक्ष पदी सुशिल तरटे


सुशिल तरटे यांचा  सत्कार करतांना बंडोपंत जायभाय , व इतर. ( छाया : समीर तांबोळी )
कातरखटाव @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
कातरखटाव ( ता. खटाव ) येथील सामाजिक युवा  कार्यकर्ते  ग्रामपंचायत सदस्य सुशिल तरटे याची भारतीय जनता पार्टी युवा  मोर्चाच्या खटाव तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. 

वडूज (ता. खटाव ) येथील ओंकार मंगल कार्यालयात माजी आमदार डाॅ. दिलीपराव येळगावकर यांच्या अध्यक्षतेखाली व विस्तारक बंडोपंत जायभाय  विकल्प शहा,विजय साखरे हणमंतराव देशमुख,प्रा. विक्रमसिंह घाडगे , शरद गोडसे  सतीश शेटे , प्रमोद फडतरे यांच्या प्रमुख उपस्थितीत तरटे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.

यावेळी बोलताना डाॅ. येळगावकर म्हणाले की ,गत तीन वर्षात  केंद्र  व राज्य सरकार च्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेण्यात आले असून त्याचा खर्या गरजूंना लाभ मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामास लागावे. पक्षाविरोधात गरळ ओकणार्यांना जशास तसे उत्तरे दिली पाहिजेत.आपल्या सरकार मुळेच टेंभू , उरमोडी -जिहे कठापूरच्या योजनांचा प्रश्न मार्गी लागल्याने  येणार्या निवडणूकीत माण - खटाव चा आमदार भाजपाचा असेल असा विश्वास ही डाॅ. येळगावकर यांनी व्यक्त केला. 

सत्काराला उत्तर देताना भाजपा युवा मोर्चाचे नवनिर्वाचित खटाव तालुका अध्यक्ष सुशील तरटे म्हणाले की ,  तालुक्यातील भाजपा कार्यकर्ते व वरिष्ठांनी माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्यांवर युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवत जो विश्वास व्यक्त केला आहे त्या विश्वासास पात्र राहून तालुक्यातील गावा-गावात, वाडी वस्ती वर व घरा-घरात पक्षाची ध्येय धोरणे पोहचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे.शासनाच्या विविध योजना समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्या बरोबरच गाव तेथे युवा मोर्चाची शाखा सुरू करण्याचा मानस ही तरटे यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाला अभय तावरे ,शरद गोडसे , रविंद्र खाडे , किरण जाधव , रमेश जाधव ,प्रकाश हांगे , बाळासाहेब गोडसे , सुरेश गोडसे , बाळासाहेब पाटील ,रमेश वलेकर आदीसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

Post a Comment

0 Comments