Hot Posts

6/recent/ticker-posts

पश्चिम वाई नंतर 'सिनेसृष्टीला' आता वाई तालुक्यातील पुर्वेकडच्या गावांच लागिरं...


'चांदवडी, भिवडी, किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, जांब, किकली, भुईंज, पाचवड, आसले परिसरात होत आहे मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण'



वैभव जाधव, भुईंज @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
चित्रीकरणाचा 'हाॅटस्पाॅट' म्हणून वाईला किंबहुना पश्चिम वाईला ओळखले जाते हे आपणा सर्वांना माहीतीच आहे, पण मागील वर्षी झी मराठी आणि वज्र प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या 'लागिरं झालं जी' मालिकेच चित्रीकरणं वाई तालुक्यातील चांदवडी या गावात सुरू झालं आणि वाईच्या पुर्वेला असलेलं हे छोटसं पुनर्वसित गावं अल्पावधीत अवघ्या महाराष्ट्रात प्रसिध्द झालं. आजच्या तारखेला 'लागिरं झालं जी' ही मालिका महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकप्रिय मालिका बनली आहे. मालिकेचं जवळजवळ ८५% चित्रीकरण हे चांदवडीतच होतं. शितली आणि आज्याचं घर, भैयासाहेबाचा बंगला, राहुल्याचं सलून, जम्या, टॅलेंट, यास्मिनचं घर हे सगळ काही चांदवडीतचं अाहे याशिवाय 'यशवंतराव चव्हाण महाविद्यालय पाचवड', किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, जांब, भिवडी, किकली या गावांमध्येही चित्रीकरण केल जातं. नुकतेच 'मिथुन' या आगामी मराठी चित्रपटाचं चित्रीकरण किसनवीर सहकारी साखर कारखाना भुईंज, जांब, किकली, आसले, भुईंज या ठिकाणी करण्यात आलं. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. एकंदरीत वाईच्या पश्चिम भागाप्रमाणे आता वाईच्या पुर्वेकडील भागालाही चित्रपट निर्माते चित्रीकरणासाठी पसंती देत असल्यामुळे येथील गावांना नक्कीच चांगले दिवस येतील अशी आशा आहे, आणि यातूनच स्थानिकांना छोटामोठा रोजगार तसेच स्थानिक कलाकारांना अभिनयाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात, यामुळे भुईंज व आसपासच्या गावकर्‍यांच्या चेहर्‍यावर एक वेगळाच आनंद पहायला मिळत आहे. 
पत्रकार : वैभव जाधव, आसले (ता. वाई)

Post a Comment

1 Comments

  1. For latest information you have to go to see the web and on world-wide-web I found this website as a finest web site for most up-to-date updates.

    ReplyDelete