कराड/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
केंद्र सरकारच्या स्वच्छ शहर सर्वेक्षणामध्ये कराड नगरपरिषदेने सहभाग नोंदवला आहे. गेली वर्षभर याकामी नगरपरिषदेकडून अनेक योजना राबविल्या गेलेल्या आहेत. या योजनांना प्रत्येक प्रभागातील सर्व नगरसेवक, नागरीक, स्वच्छता दूत, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी, आरोग्य व इतर सर्व विभागातील कर्मचारी या सर्वानी मेहनत घेवून शहर स्वच्छ ठेवणेकामी मोलाचे कार्य केले आहे. या स्पर्धेतील स्वच्छ वार्ड स्पर्धेचा निकाल नगराध्यक्षा सौ. रोहिणी उमेश शिंदे व मुख्याधिकारी श्री.यशवंत डांगे यांनी जाहीर केला.
याप्रसंगी बांधकाम सभापती हणमंतराव पवार, आरोग्य सभापती सौ. प्रियांका यादव जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजय वाटेगांवकर, सौरभ पाटील, सुहास जगताप, इंद्रजीत गुजर, अंजली कुंभार, वैभव हिंगमिरे, घन:श्याम पेंढारकर, यांच्यासह फारुक पटवेकर, प्रीतम यादव, राहूल खराडे, शिवराज इंगवले बांधकाम अभियंता एम.एच.पाटील व अधिकारी उपस्थित होते. त्रयस्थ संस्थेमार्फत केलेल्या परिक्षणातून प्रथम क्रमांकाचे 20 लाखाचे पहिले बक्षिस वार्ड क्रमांक 2 व वार्ड क्रमांक 5 यांना विभागून देण्यात आले. या दोन्ही वार्डना प्रत्येकी 1415 गुण मिळाले. व्दितीय क्रमांकाचे र.रु.15 लाखाचे बक्षिस वार्ड क्रमांक 3 व वार्ड क्रमांक 6 यांना विभागून देण्यात आले. या दोन्ही वार्डना प्रत्येकी 1390 गुण मिळाले. तर तृतीय क्रमांकाचे 10 लाखाचे बक्षीस वार्ड क्रमांक 1 व वार्ड क्रमांक 8 यांना मिळाले . या दोन्ही वार्डना प्रत्येकी 1190 गुण मिळाले. या सर्वांचे विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे. यावेळी बोलताना नगराध्यक्षा म्हणाल्या की, स्वच्छ वार्ड स्पर्धेत वरील वार्ड जरी विजेते ठरले आहे. पण त्यांच्याबरोबर गावातील इतर वार्डानींही या स्पर्धेसाठी उत्तम तयारी केली होती. त्यामुळे खरेतर सर्वच वार्ड विजयी झाले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. शहरातील सर्व 33 नगरसेवक, मुख्याधिकारी, आरोग्य तसेच इतर विभागातील अधिकारी व कर्मचारी, स्वच्छता दूत, शहरातील विविध संघटना,शाळा, हायस्कूल, कॉलेज, चे सर्व शिक्षक, शिक्षीका, विदयार्थीवर्ग,बँका,पतसंस्था,हॉटेल व उपहारगृहे तसेच सहकारी व खाजगी संस्था याच बरोबर कराडचे समस्त शहरवासीय नागरीक विशेषत: शहरातील महिला या सर्वांनी घेतलेल्या मेहनतीमुळे कराड शहर स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेमध्ये देशपातळीवर पहिल्या 10 क्रमांकाच्या आत मजल मारु शकले आहे. यामध्ये लोकसहभाग अतिशय मोलाचा होता व आहे. याबददल वरील सर्वांचे तसेच समस्त कराडकरांचे जाहीर आभार आणि एवढयावरच न थांबता संपूर्ण वर्षभर वर्षातील 365 दिवस ही स्वच्छता मोहिम अशीच सुरु रहाणार आहे. यासाठी नागरीकांनीही नगरपरिषदेस अशीच मोलाची साथ दयावी. अशी विनंतीही नगराध्यक्षांनी शहरवासीयांना केली.

0 Comments