कुकुडवाड/ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
दुष्काळावर मात करण्यासाठी सर्वानी एकत्र येवून काम करण्याची गरज आहे.गावातील गट तट बाजूला ठेवून आपले गाव पाणीदार करायचे आहे हे स्वप्न बघावे आणि ते सत्यात उतरवण्यासाठी गावातील सर्व लोकांनी प्रयत्न करावेत. पाणी चळवळ लोकचळवळ व्हावी असे प्रतिपादन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षा प्रा.कविता म्हेत्रे यांनी केले त्या वडजल येथे ग्रामसभेत बोलत होत्या.पाणी फौउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत भाग घेतल्या निमित्ताने ग्रामसभेचे आयोजन केले होते.
यावेळी वडजल गावचे सुपुत्र उपजिल्हाधिकारी श्री.राजेश काटकार,सरपंच सौ.चंद्रकला काटकर,किरकसालचे सरपंच श्री.अमोल काटकर,श्री.प्रदीप पोळ,सौ.सुदर्शना पोळ, श्री.तात्या काटकर,श्री.पोपट बनसोडे उपस्थित होते
यावेळी बोलताना प्रा कविता म्हेत्रे म्हणाल्या की, माणमध्ये कायम दुष्काळ असतो.ह्या दुष्काळावर मात करायची असेल तर जलसंधारणांचे काम करावे लागेल..पडणारे पावसाचे पाणी वाहून जावू नये म्हणून आपल्याला जमिनीत भांडी तयार करावी लागतील.यासाठी नियोजन करावे लागेल.गावातील प्रत्येकांनी सहभागी झाले तरच हे लक्ष्य आपण गाठू शकतो.यासाठी सर्वानी मदतीचा हात पुढे करायला पाहिजे..श्रम,वेळ,पैसा जे काही आपल्याला देता येईल ते गावासाठी द्यायला पाहिजे.वॉटर कप स्पर्धेत पहिले बक्षीस मिळवणे ह्या ध्येयाबरोबर आपले गाव पाणीदार करायचे आहे ही पक्की खुणगाठ असली पाहिजे यासाठी सर्वांनी एकत्र येवून ही पाणी चळवळ लोकचळवळ करावी
या ग्रामसभेला राजेश काटकर,अमोल काटकर,प्रदीप पोळ यांनी मार्गदर्शन केले..
यावेळी सौ.सुदर्शना पोळ यांनी आपल्या गावासाठी 25000/-रूपये देवून ग्रामस्थांना मदतीचे आवाहन केले.मुंबईला असलेल्या गावकर्यानी मोठी मदत केल्याची आकडेवारी वाचून दाखवण्यात आली..

0 Comments