म्हसवड/सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
शिखर शिंगणापूर येथील श्री शंभू महादेवाच्या यात्रेनिमित्त आलेल्या भाविकांसाठी पुणे येथील माणदेश फाऊंडेशनेच्या वतीने मोफत सर्व रोग निदान व नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन केले होते.
या शिबीरात बारामती येथील कै. रा. तु. भोईटे प्रतिष्ठानचे गिरीराज हॉस्पिटल, माण तालुक्यातील आरोग्य विभागाच्या पथकाने हजारो रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार केले. त्याचबरोबर 650 मोफत चष्मे व तब्बल 40 हजार रुपयांची औषधे मोफत वाटण्यात आली.
शिबिराचे उद्घाटन निवृत्त जलसंधारण सचिव प्रभाकर देशमुख यांच्याहस्ते करण्यात आले . यावेळी म्हसवडच्या उपनगराध्यक्षा सौ.स्नेहल सूर्यवंशी , शिंगणापूरपूचे सरपंच अभय मेनकुदळे , पुळकोटीच्या सरपंच सौ. मीनाक्षी सावंत , तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, डॉ. सौ. आरती गावडे , बेल भडांरा विचार मंचाचे अध्यक्ष डॉ प्रमोद गावडे, सुरेश पुकळे, वीरभद्र कावडे, आदी मान्यवर उपस्थित होते.

0 Comments