Ticker

6/recent/ticker-posts

आधी स्वत:चे कारनामे तपासा, ‘बळीराजा’वर ‘स्वाभिमानी’चा पलटवार


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सभासद नोंदणी घेतलेले पैसे खंडणी म्हणणार्‍या संघटनेच्या पदाधिकार्‍यांचे सुरू असलेले उद्योग केंद्रीय अध्यक्षांनी आधी तपासावेत. दुसर्‍या संघटनाप्रमाणे नाव बळीराजाचे अन काम व्यापार्‍यांसाठी असे न करता स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकर्‍यांची संघटना असून ही शेतकर्‍यांसाठी कार्यरत आहे, असा टोला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सचिन नलावडे यांनी नाव न घेता बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकार्‍यांना लगाविला.
येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत सचिन नलावडे बोलत होते. संघटक अनिल घराळबापू, संघटनेचे पदाधिकारी तसेच मलकापूर येथील भाजी मंईडत विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी उपस्थित होते.
आमचा कोणालाही विरोध नाही किंवा कोणावरही सक्ती नाही. ज्याला ज्याठिकाणी भाजी विकायची आहे. त्याठिकाणी विकावी सर्व सामान्य शेतकर्‍यांना वेठीस धरून नाहक त्रास देण्याच उद्योग कोणी करेलतर गाठ स्वाभिमानी संघटनेशी आहे, असा इशाराही नलावडे यांनी दिला. सचिन नलावडे म्हणाले, मलकापूर येथील खाजगी जागेतील भाजी मंडईला शेतकर्‍यांचा नव्हेतर काही मुजोर शेतकर्‍यांना लुबाडणार्‍या व्यापार्‍यांचा विरोध आहे. त्यामुळेच आमच्या बरोबर मंडईतील 90 शेतकरी व व्यापारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सोबत आहेत. नगर पंचायतीच्या भाजी मंडई होण्यासही आमचा विरोध नाही. ना आम्हाला श्रेयवाद करायचा आहे. सर्वसामान्य शेतकर्‍यांना न्याय मिळवून देण्याची भूमिका आहे.
शेतकर्‍यांच्या मागणीवरून स्वाभिमानी शेतकरी संघटना मलकापूर भाजी मंडईच्या प्रश्नात पुढे आली आहे. शेतकर्‍यांचे भले करण्यासाठी आम्ही आणखी दोन पावले मागे घेण्यास अथवा हातातहात घालून दोन पावले पुढे जाण्यास आम्ही केव्हाही तयार आहोत, असा सूचक इशाराही नलावडे यांनी यावेळी दिला.

                        यावेळी उपस्थितीत असलेल्या शेतकरी व व्यापार्‍यांनी आम्हाच्या कडून कसल्याप्रकारे जबरदस्तीने पैसे घेतले नाहीत. तर गुंठभर जमीनही नसणारे व्यापारी बळीराजा शेतकरी संघटनेचे बिल्ले लावून आम्हा गरिबांवर दांडगावा करत आहेत. त्यांच्यापासून संरक्षण मिळावे म्हणून आणि जातीचे शेतकरी असल्याने आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेची शंभर रुपयांची पावती फाडून सभासद झालो आहोत, असे सांगितले.

Post a Comment

0 Comments