Ticker

6/recent/ticker-posts

फलटण नगरपालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेतुन विरोधकांचा सभात्याग (पहा व्हिडिओ)


विक्रम चोरमले/सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क
आज रोजी फलटण नगर परिषद फलटण येथे झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये विषय क्रमांक ५ मधील पृथ्वी चौक ते खडकहिरा ओढ्यापर्यंत गटार करिता पावसाळ्यात सिमेंट पाईप बसविण्यात आल्या होत्या.महाराष्ट्र नगरपरिषदा,नगर पंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५८ अ अन्वये तात्काळ करावयाच्या कारवाईत नगराध्यक्षांनी पक्षपातीपणा केल्याचा आरोप करीत विरोधकांनी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली विरोधी गटातील सर्व आठ नगरसेवक यांनी आज झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेचा सभात्याग केला. आमच्या तक्रारीचा विचार जर होत नसेल आणि मनमानी कारभार होत असेल तर आम्ही जिल्हाधिकारी यांच्याकडे रीतसर दाद मागू असे नगरसेवक अशोक जाधव यांनी सभागृहात ठणकावून सांगितले.
दरम्यान, आजच्या सभेत काय घडल ते पहा सविस्तर पुढील व्हिडिओत.



Post a Comment

0 Comments