Ticker

6/recent/ticker-posts

भारत पाटणकरांनी घेतला टीकाकारांचा समाचार


पाटण@ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क  
कोयना प्रकल्पग्रस्त जनतेने 23 दिवस आपली घरे दारे,मुलेबाळे सोडून ठिय्या मारून आंदोलन केले त्याची दखल मुख्यमंत्र्यांनी घेऊन बैठक बोलावूनमागण्यांसंदर्भात  सकारात्मक चर्चा करूण मागण्यां मान्य केल्या हे या प्रकल्पग्रस्त जनतेचे श्रेय आहे हे मी या आगोदरच जाहीर केले आहे, प्रकल्पग्रस्तांच्या वर ही वेळ कुणामुळे आली? मला धमकीचे अनेक पत्र व फोन येतात, पण भविष्यात हुतात्मा होण्याची वेळ आली तरी बेहत्तर पण मी गोरगरीब जनतेची साथ कधीही सोडणार नाही, श्रेयवाद व आरोप  करणारांनी स्वताचा इतिहास बघून आपण  प्रकल्पग्रस्तांच्या साठी काय केले याचे उत्तर मिळेल अशा शब्दांत श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डाॅ भारत पाटणकर यांनी टिकाकारांचा खरपूस समाचार घेतला आहे.
कोयनानगर येथील तीन मंदिरात झालेल्या कोयना  प्रकल्पग्रस्तांच्या  मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी जिल्हाध्यक्ष डाॅ प्रशांत पन्हाळकर, हरिश्चंद्र दळवी, संतोष गोटल, डी डी कदम,चैतन्य दळवी, बळीराम कदम, श्रीपती माने, संजय लाड यांची उपस्थिती होती.
यावेळी डाॅ पाटणकर म्हणाले की, कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनास मिळालेले यश हे या गोरगरीब जनतेचे यश आहे, 60 वर्षांपूर्वी राष्ट्र कार्य म्हणून येथील भोळ्या- भाबड्या जनतेने आपल्या जमिनी दिल्या, तत्कालीन राज्यकर्त्यांनी "खणाला खण, फणाला फण " देऊ अशी आश्वासन देऊन  वा-यावर सोडले, त्यामुळे ही गोरगरीब जनता  देशोधडीला लागली, या जनतेला नेहमीच पायदळी तुडवले, श्रमिक मुक्ती दल कोणतेही आर्थिक पाठबळ नसलेली एकमेव संघटना आहे, जनतेसाठी कोणतीही तडजोड करत नाही,1986 ला मी प्रकल्पग्रस्तांच्या गावागावात फिरलो व लढा दिला, त्यामुळे कोयनेला प्रथम पुनर्वसन कायदा लागू झाला,मी आंदोलनाला माणूस आहे, मला निवडणूक लढवायची नाही, मात्र माझे आडनाव पाटणकर आहे यात माझा काय दोष,अशी खिल्ली उडवून डाॅ पाटणकर म्हणाले की, ठिय्या आंदोलनाच्या वादळाने चर्चा झाली,पण त्याची अंमलबजावणी सोपी नसते, त्यासाठी सर्वजण संघटीत आसणे गरजेचे आहे, कष्टकरी जनता संघटीत झाल्यास इतिहास घडू शकतो, त्यामुळे या आंदोलनात राजकारण न आणता काम केले तर मी हुतात्मा झालो तरी बेहत्तर तुमची साथ सोडणार नाही. असे भावनिक आवाहन डाॅ भारत पाटणकर यांनी केले, यावेळी हजारोंच्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.
चौकट-मी धरणग्रस्तांना वेठीस धरले आहे असा आरोप केला जात आहे, तुम्ही बोलावले म्हणुन मी आलो आता तुमचे काम झाले आहे मी थांबतो असे भारत पाटणकर यांनी जाहिर करताच प्रकल्पग्रस्तांनी आम्ही राजकारण सोडू पण तुम्हाला सोडणार नाही असे हात वर करून सांगितले.

Post a Comment

0 Comments