राजमाता जिजाऊ संस्था कराड येथील अनाथ बालकांना गणेश चोरगे यांच्या वाढदिवसानिमित्त मदत
कराड- अनाथ बालकांचे संगोपन करून त्यांच्या भविष्यातील उन्नतीसाठी काम करणाऱ्या मु. पो. कोळे ता. कराड जि. सातारा येथील राजमाता जिजाऊ संस्थेला उपयोगी साहित्य, खाद्यतेल, कडधान्ये आदींची मदत गणेश चोरगे मित्र परिवारातर्फे करण्यात आली. संस्थेचे प्रमुख समीर नदाफ यांनी संस्था करीत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. संस्था व नदाफ कुटुंबिय यांच्या कार्याचे सर्वांनी कौतुक केले तसेच यापुढेही काही मदत लागल्यास संभाजी ब्रिगेड संस्थेच्या पाठीमागे खंबीरपणे उभी राहील याचा विश्वास गणेश चोरगे यांनी दिला.
कार्यक्रमाप्रसंगी संभाजी ब्रिगेड सातारा जिल्हा कार्याध्यक्ष गौरव डोंगरे, जिल्हासचिव श्रीकांत नार्वे, जिल्हासंघटक आशिष गाडे, कराड तालुकाध्यक्ष शैलेश मोरे, कराड शहराध्यक्ष भूषण पाटील, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष संभाजी शेडगे, नरेंद्र बर्गे, सुरज कोळपे, प्रणव पवार, अतुल किर्दत, तुषार बाबर, स्वप्नील नलावडे, विकास फडतरे, रोहित जाधव, श्री पाटील उपस्थित होते.

0 Comments