Ticker

6/recent/ticker-posts

अखेर अण्णांच्या पुढे सरकार झुकले..अण्णांचे उपोषण मागे


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क 
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अखेर सात दिवसांनी उपोषण मागे घेतले आहे. अण्णांनी उपोषण मागे घ्यावे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन यांनी स्वतःहून अण्णांशी मंचावर चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या शिष्टाईला अखेर मिळालं असून, अण्णांनी उपोषण मागे घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अण्णा हजारे यांनी लिंबू पाणी घेत आपले उपोषण मागे घेतले आहे . अण्णा हजारे यांच्या बहुतांश मागण्यांना तत्त्वतः मान्यता देण्यात आली आहे. या मागण्यांच्या अंमलबजावणीसाठी अण्णांनी सरकारला ६ महिन्यांचा अल्टिमेटम दिला आहे .

तसेच अण्णांची जनलोकपालाच्या मागणीसह बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. अण्णांच्या मागणीनुसार कृषिमूल्य आयुक्तांच्या स्वायत्तेवर उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाणार आहे. केंद्रीय कृषी राज्यमंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांनी अण्णांच्या बहुतांश मागण्या मान्य करत असल्याची घोषणा केली आहे. गेल्या सहा दिवसांपासून दिल्लीमध्ये रामलीला मैदानावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं उपोषण सुरू होतं. या उपोषणामुळे अण्णांचे वजन तब्बल साडे पाच किलोने घटले आहे. तसेच डॉक्टरांनी त्यांना भरपूर पाणी पिण्यासह आरामाचा सल्ला दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत अण्णांनी उपोषण मागे घेतलं आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या असून उपोषण मागे घेत आहे, असं अण्णांनी जाहीर केलं. त्यामुळे अण्णांना दिलेल्या वाचनाला सरकार कितपत जगेल हे येत्या काळात पाहावे लागेल.

अन्नाचे आंदोलन हे वैयक्तिक नसून शेतीमाल दीड पट हमी भाव मिळावा. शेतकरी आत्महत्या कमी व्हाव्यात. शेतकऱ्यांनी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात , लोकपालची नियुक्त करावी , अशा मागण्यासाठी होते. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्याची मागणी करणा-या शेतक-यांची संख्या यंदा लक्षणीय होती.पंजाब, हरयाणातून येणा-या शेतक-यांची संख्या मोठी असली तरी त्यांच्या बसेस अडवण्यात आल्या असल्याचा आरोप अण्णा हजारे यांनी केला होता. 

Post a Comment

0 Comments