Ticker

6/recent/ticker-posts

समर्थ वाग्देव चित्रपटाच्या गाण्याचे यू ट्यूबवर लाँचिंग


पुणे /सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
वाठार स्टेशन येतील श्री समर्थ वाग्देव महाराज यांच्या जीवनचरित्रावर चित्रपट येत आहे.  नुकतेच सुमित म्युझिक या यू ट्युब वाहिनीवर या चित्रपटातील गाण्यांचे लॉचिंग करण्यात आले. या चित्रपटाला प्रसाद माने यांचे दिग्दर्शन असून डॉ. शिवाजी माने निर्माते आणि त्यांची कथा संकल्पना त्यांची आहे.
संगीतकार आणि  गीतकार प्रदीप कांबळे आहेत.  चित्रपटातील दोन्ही गाणी सुमित म्युझिक या वन मिलियन युझर असणार्‍या वाहिनीवर रिलीज करण्यात आली आहेत. गायिका राधिका अत्रे आणि प्रदीप कांबळे यांनी गीते गायली आहेत.
महाराष्ट्रातील वाग्देव महाराज यांच्या भक्तांसाठी ही गाणी अतिशय जुन्या आठवणी जाग्या करतील, असा विश्वास प्रसाद माने यांनी व्यक्त केला. समर्थ वाग्देव महाराज यांचे महाराष्ट्रात लाखो भक्त असून त्यांच्यासह महाराष्ट्रातील लोकांना माहिती व्हावी,  या उद्देशाने डॉ.शिवाजी माने यांनी चित्रपट निर्मिती करण्याचा हेतू सांगितला. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील म्हसवडचे युवा दिग्दर्शक म्हणून स्वताची ओळख असणारे प्रसाद माने यांना शिक्षणमहर्षी पांडुरंग हिरवे नंतर हाही  चित्रपट हिस्टॉरिकल असल्यामुळे यावेळीही काहीतरी नवीन पाहायला मिळेल.

Post a Comment

0 Comments