सातारा @ सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
भीमा कोरेगाव हिंसाचाराप्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संभाजी भिडे गुरुजी यांना क्लीन चिट दिल्याने चैतन्य निर्माण झालेल्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या हजारो धारकर्यांनी राजधानी सातार्यात बुधवारी आयोजित केलेल्या मोर्चाचे विजय मोर्चात रुपांतर झाले. दरम्यान, या मोर्चाला समविचारी हिंदुत्ववादी संघटनांनी दिलेल्या उत्स्फूर्त आणि सक्रीय पाठींब्याने अवघे सातारा शहर भगवे झाले होते. यावेळी जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले.
गांधी मैदानावर सकाळी 10 पासून धारकर्यांनी गर्दी केली होती. जिल्ह्यातून आलेले हजारो धारकर्यांच्या उपस्थितीत पारंपरिक घोषणांनी कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर विठ्ठलस्वामी, शहाजीबुवा रामदासी व इतर मान्यवरांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आले. त्यानंतर उपस्थितांनी प्रेरणा मंत्र म्हटला.
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना विजयाताई भोसले म्हणाल्या, प्रकाश आंबेडकर यांनी पूर्ण अभ्यास करुनच भिडेगुरुजींवर बोलावे, भिडेगुरुजींवर केलेले खोटे आरोप त्यांनी मागे घ्यावेत, वस्तुत: सरकारने प्रकाश आंबेडकर यांनाच अटक करावे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

0 Comments