सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
गोंदवले: माणचे राष्ट्रवादी नेते शेखर गोरे यांचा मोक्का रद्द झाल्याने माण तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे. गुन्ह्यातूनही ते निर्दोष सुटतील, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा असून मिशन 2019 साठी भाऊंचा प्रत्येक कार्यकर्ता सज्ज झाला असून आता आमदार शेखर गोरेच असतील, असा विश्वास भाऊंचे खंदे कार्यकर्ते संदीपशेठ घोरपडे यांनी व्यक्त केला.
आमदार जयकुमार गोरे यांच्या यशात मोलाचा वाटा असणार्या शेखर गोरेंनी 2014 च्या निवडणुकीत स्वतंत्र वाट चोखाळली. यात त्यांचा निसटता पराभव झाला. परंतु, शेखर गोरेंचा माणमधला झंझावात कायम राहिला. भाऊंनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, म्हसवड नगरपरिषद अशा एकामागोमाग एक सत्ता शेखर गोरेंच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीकडे आल्या. मिशन 2019 च्या दृष्टीने ही महत्वाची गोष्ट होती. शेखरभाऊ प्रतिष्ठानच्यावतीने हजारो तरुणांची ताकद त्यांच्या मागे उभी असून आता तालुक्याला त्यांच्यासारख्या दमदार आमदाराची गरज आहे. त्यांचे वाढते वर्चस्व सहन न झाल्यानेच त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकविण्याचे प्रयत्न झाले. त्यांच्याविरोधात मोक्काची कारवाई करण्यात आली. परंतु, ही कारवाई राजकीय हेतूने करण्यात आली होती, हे आता स्पष्ट झाले आहे.
आज मोक्का रद्द झाला आहे. येत्या काही दिवसांत गुन्हेही मागे घेतले जातील. त्यामुळे कार्यकर्ते उत्साही झाले आहेत. आता शेखर गोरे या ढाण्या वाघाची तालुक्यात रॉयल एंट्री होणार असून त्यांना आमदार होण्यापासून आता कोणीही आडवू शकत नाही. त्यामुळे 2019 ला माण-खटावचे आमदार शेखर गोेरेच असणार यात काही शंका नाही, असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

0 Comments