विक्रम चोरमले/ सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क :- विडणी येथील नगारकी नावाच्या शेतात फलटण ग्रामीण पोलिसांनी परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक पवन बन्सोड यांच्या नेतृत्वाखाली फलटण ग्रामीण पोलिस पथकाने धाड टाकून अफूची ५९६ झाडे बोंडासह हस्तगत करून मुद्देमाल ताब्यात घेऊन संबंधित अफूची बेकायदेशीर शेती करणार्या शेतकऱ्यांला ताब्यात घेण्यात आले आहे.
फलटण ग्रामीण पोलिस स्टेशन यांचेकडून व घटनास्थळावरुन मिळालेली मिळालेली माहिती अशी की, विडणी ता फलटण गावच्या हद्दीत आळंदी-पंढरपूर पालखी महामार्गालगत इंगळे- कदम वस्तीनजीक नगारकी नावाच्या शिवारात पोपट यशवंत यादव वय-५१ या शेतकऱ्याच्या गट नं ३४२ येथील ऊसाच्या शेतात काद्याचे आंतर पिकात अफूची झाडे असल्याची खबऱ्या मार्फत माहिती फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे परिविक्षाधीन पोलिस अधिक्षक पवन बन्सोड यांना मिळाली होती.
दिनांक ३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सर्व तयारी निशी सापळा रचून पोपट यादव यांच्या शेतात धाड टाकली असता ऊसाच्या शेतात कांद्याच्या आंतर पिकामध्ये अफूची बोंडे आलेली झाडे आढळून आल्यानंतर सदर शेतातील अफूची बोंडे असलेले ५९६ झाडे उपटून ताब्यात घेऊन जप्त करण्यात आली. या कारवाईत ८ किलो ९८० ग्राम वजनाची ८९८० रुपये किंमतीची अफूच्या बोंडे सापडली. सर्व मुद्देमालाचे साक्षीदार समक्ष पंचनामा करुन मुद्देमाल सीलबंद करणेत आला. यावेळी फलटण तहसिलचे नायब तहसिलदार नंदकुमार भोईटे,कृषि विभागाचे मंडल कृषि अधिकारी पी.जी. काटकर यांच्या समवेत पोलिस कर्मचारी यांनी पंचनामाचे काम पाहिले. यावेळी पोलिस अधिक्षक पवन बन्सोड, पोलिस उपनिरीक्षक आर.आर.भोळ, पो.ह मते, पो.ना वाडकर, पो.ना भोसले, पो.ना तुपे, पो.कॉ काशीद, पो.कॉ काळे, पो.कॉ भोसले, पो.कॉ वसावे, पो.कॉ शेख, पो.कॉ कणसे,पो.कॉ पाटोळे, पो.कॉ देवकर, पो.ह खाडे यांनी सहभाग घेतला. संबंधित शेतकऱ्यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अधिक तपास फलटण ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस अधिक्षक पवन बन्सोड करीत आहेत.
अफू व गांजा यांच्यात फरक आहे:पोलिस अधिक्षक पवन बन्सोड
अफू व गांजा यामध्ये फरक आहे या दोन्हीला एकच समजण्याची गल्लत करू नये, अफूचे उत्पादन प्रामुख्याने राजस्थान, मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश या राज्यातील ठराविक भागात होते, विडणी येथे कारवाईत गांज्याची झाडे सापडली नसून अफूची झाडे सापडली आहेत. अफूच्या झाडची उंची, पाने, गुणधर्म हे गांजा पेक्षा वेगळे आहेत. अफूची किंमत ही जास्त आहे अशी माहिती पोलिस अधिक्षक पवन बन्सोड यांनी पत्रकार यांना दिली.
(सविस्तर बातमी दिनांक ५ च्या अंकात)
0 Comments