Ticker

6/recent/ticker-posts

भाजपा महामेळव्यास बहूसंखेने उपस्थीत रहा अनिल देसाई


सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क / दहिवडी 
भाजप स्थापना दिवस 6 एप्रिल निमित्त मुंबई येथे बांद्रा-कुर्ला काॅम्प्लेक्स  मैदानावर होणाऱ्यामहाराष्ट्र भाजप मेळाव्यास कार्यकर्त्यांचा महासागर लोटणार असून माणमधील भाजप कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपली ताकद दाखवून द्यावी .
मुंबई येथे 6एप्रील रोजी होणाऱ्या भाजपा महामेळव्यास बहूसंखेने उपस्थीत रहावे असे आवाहन जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई यांनी केले.
भाजपाच्या महामेळाव्याच्या नियोजनासाठी दहिवडी ता. माण येथील देसाई हाईट्स येथे प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक जिल्हाउपाध्यक्ष अनिल देसाई यांच्या नेतृत्वाखाली आयोजीत करण्यात आली. 
यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, या वर्धापनदिनी पाच लाख भाजपचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. कार्यकर्त्याला या मेळाव्यात कोणतीही तोशिष लागणार नाही. बसेस, नाष्टा, जेवणाची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी मेळाव्यास बहुसंख्येने उपस्थित राहायचे आहेत.भाजप एकमेव असा पक्ष आहे जे बोलतो तसा करतो.येत्या काही दिवसात कापूसवाडी ते महाबळेश्वरवाडी पर्यंतचे तलाव भरलेले दिसतील. आम्ही बोटिंग करणार नाही पण पाणी मात्र नक्की दाखवू. 4500 कोटीची कामे जिल्ह्यात सुरु आहेत. माणमधून दोन राष्ट्रीय महामार्ग जात आहेत. सातारा-सोलापूरचे काम प्रत्यक्ष सुरु आहे. 2  लाख कोटीच्या निधीची तरतूद केंद्र सरकारने बजेटमध्ये केली आहे. भाजप सरकारच्या माध्यमातून 2025 पर्यंत भारत महासत्ता बनणार आहे. जिहे-कटापूर योजना नितीन गडकरी यांच्या माध्यमातून पुर्ण होईल याची खात्री सामान्य जनतेला आहे. कोणी काही म्हणू द्या भाजपच्या माध्यमातून जी रस्त्याची कामं झाली आहेत त्यांचे उद्घाटन चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करणार आहोत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सर्वाना भिती वाटात आहें
यावेळी माण तालुक्यातील सर्व आघाडीचे प्रमुख व सर्व् मोर्चाचे अध्यक्ष उपाध्यक्ष उपस्थीत होते. यावेळी विस्तारक बंडूपंत जायभाय, तालुकाध्यक्ष बाळासाहेब मासाळ, जिल्हा उपाध्यक्ष विजय साखरे, जिल्हा चिटणीस मार्तंड गुरव,शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विश्वंभर बाबर, जालींदर खरात,डॉ.उज्वल काळे,अमृत चौगूले, संदिप भोसले ,डॉ. महादेव कापसे, मंगेश खरात,बापुसाहेब साखरे,विजय टाकणे,अशोक पवार ,मन्सुर मुल्ला, गणेश माने माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. भारतिय जनता पार्टीच्या 38 स्थापना दीनाच्या निमित्ताने मुंब ई येथे होणाऱ्या महा मेळाव्यासाठी प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने कार्यकत्यांनी हजर राहण्याचे आवाहन यावेळी अनिल देसाई यांनी केले.
यावेळी विजय साखरे,डॉ.कापसे, बाबर, बाळासाहेब मासाळ यांनी मनोगत व्यक्त केले. बापूसाहेब साखरे यांनी प्रास्ताविक केले तर युवराज काळेल यांनी आभार मानले यांनतर घर चलो अभियानाचा प्रारंभ अनिल देसाई यांचे हस्ते दहिवडी शहराध्यक्ष बापू साखरे यांच्या घराच्या छतावर भाजपचा ध्वज लावून करण्यात आला.

Post a Comment

0 Comments