विक्रम चोरमले / सत्य सहयाद्री न्यूज नेटवर्क
फलटण नगर परिषद स्विकृत नगरसेवकपदाच्या रिक्त जागेसाठी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सुभाषराव सूर्यवंशी (बेडके) यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने आज नगराध्यक्षा निता नेवसे यांनी त्यांची फलटण नगरपरिषदेच्या स्विकृत नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहिर केले.
फलटण नगर परिषदेतील संख्याबळाच्या आधारे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे 2 आणि विरोधी राष्ट्रीय काँग्रेसचा 1 असा स्विकृत नगरसेवक पदाचा कोटा असून राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे स्विकृत नगरसेवक डॉ. प्रविण आगवणे यांनी आपल्यापदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या जागेवर निवडीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतीम दिवशी राष्ट्रीय काँग्रेस पक्षातर्फे सचिन सूर्यवंशी (बेडके) यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने त्यांच्या निवडीची औपचारिक घोषणा बाकी होती.
आज सोमवार दि. 2 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता नगर परिषदेच्या विशेष सर्वसाधारण सभेत पिठासीन अधिकारी तथा नगराध्यक्षा सौ. नीताताई मिलिंद नेवसे यांच्याकडून त्यांच्या बिनविरोध निवडीची घोषणा करण्यात आली.
या घोषणेनंतर नवनिर्वाचित नगरसेवक यांचा सत्कार नगराध्यक्षा निता नेवसे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर सभागृहात बेडके यांचे अभिनंदन कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, विरोधी पक्ष नेते समशेरसिंह नाईक निंबाळकर, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, काँग्रेसचे गटनेते अशोक जाधव, मुख्याधिकारी धैर्यशील जाधव यांच्यासह काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केले. बेडके यांची निवड जाहिर होताच त्यांच्या समर्थकांनी नगरपरिषदे समोर फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळन केली. यानंतर सचिन सूर्यवंशी ( बेडके ), समशेरसिंह नाईक निंबाळकर, अशोकराव जाधव, सचिन अहिवळे व अन्य नगरसेवक यांनी कार्यकर्त्यासह छ. शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर बेडके यांनी माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर व जेष्ठ नेते सुभाषराव सूर्यवंशी बेडके यांचे आशिर्वाद घेतले यानंतर कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजीतसिंह नाईक निंबाळकर, युवा नेते धनंजय साळुंखे पाटील, युवक नेतृत्व दिगंबर आगवणे, युवा नेते महेंद्र सूर्यवंशी ( बेडके ) यांच्यासह राजकीय, सामाजिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील माण्यवरांनी व मित्र परिवाराच्या वतीने सचिन सूर्यवंशी (बेडके) यांचे अभिनंदन व सत्कार केला.
फोटो ओळ -
सचिन सूर्यवंशी (बेडके) यांचा सत्कार करताना निता नेवसे सोबत श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, समशेरसिंह नाईक निंबाळकर, नंदकुमार भोईटे, अशोक जाधव, श्रीमंत सुभद्राराजे नाईक निंबाळकर, धैर्यशील जाधव व अन्य

0 Comments